A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

संजय पारधी
बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या वतीने बामणी(दुधोली) गावात दि. 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिबीर राबविण्यात आले या अंतर्गत विविध बौद्धीक व प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच व्यक्तिमत्व विकास यावर मान्यवरांचे मार्गदर्शन पार पडले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार व ग्रामस्वच्छता तसेच ग्रामदिंडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले विशेष बाब म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने “आरोग्य निदान शिबीर” घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रल्हाद बुधाजी आलाम सरपंच बामणी ग्रामपंचायत, डॉ. पल्लवी जुनघरे रासेयो कार्यक्रम अधिकारी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रजत मंडल यांची विचार पिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली मान्यवरांच्या मनोगता नंतर विविध स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या शिबिरातील स्वयंसेवकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने झाला. या शिबिराच्या यशस्वीततेसाठी डॉ. पल्लवी जुनघरे रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ. विनय कवाडे, सहकार्यक्रम अधिकारी, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. शुभांगी भेंडे यांच्या सोबत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Back to top button
error: Content is protected !!