A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे क्रीडा सभा संपन्

WhatsApp Image 2024 07 19 at 12.16.33

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर :- तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे आज दिनांक 18 जुलै 2024 ला बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यातील शारीरिक शिक्षकांची सभा संपन्न झाली. या सभेकरिता बल्लारपूर तालुका क्रीडा अधिकारी मनोज पन्द्राम, चंद्रपूर तालुका क्रीडा अधिकारी नंदू आवारे, मोरेश्वर गायकवाड आणि वाल्मीक खोब्रागडे उपस्थित होते .प्रास्ताविक बल्लारपूर तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 : 25 चे आयोजना निमित्त ही बैठक ठरविण्यात आली. बैठकीची सुरुवात ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू स्व. श्री खाशाबा जाधव यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले. यानंतर खेळामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झाले त्याविषयी माहिती देण्यात आली. किडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल समिती बल्लारपूर मार्फत 2024 25 मध्ये राज्यस्तरीय विभाग स्तरीय जिल्हास्तरीय व तालुका स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता बल्लारपूर शहरात क्रीडा शिक्षकाची सभेचे आयोजन करण्यात आले आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तालुका क्रीडा स्पर्धा पार पडाव्या त्यासाठी राजुरा तालुक्यातील व बल्लारपूर तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. ऑगस्टपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत असे आयोजक्याच्या वतीने सांगण्यात आले.

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!