
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने व 21 महाराष्ट्र बटालियन अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाराष्ट्र शासनाच्या हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर NCC विभागातर्फे घरोघरी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत NCC 85 कॅडेट्स सहभागी झाले होते. ही रॅली महाविद्यालयातून, साईबाबा वॉर्ड डब्ल्यूसीएल ग्राउंड, गांधी पुतळा मार्गे निघून बल्लारपूरातील ऐतिहासिक किल्ल्यावर समाप्त झाली. यावेळी प्रा. ले. योगेश टेकाडे, डॉ. सुनिल कायरकर व महाविद्यालयातील ईतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.