A2Z सभी खबर सभी जिले की

नितेश कराळे सर आणि सीताक्का यांनी संतोषसिंह रावत यांनाच मते देण्याचे केले आवाहन .

मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला उपस्थितांनी केले संबोधित

समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
आज दि. सोमवार दिनांक 18/11/2024 रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजता बस्ती येथील गांधी पुतळा परिसरात मुख्य वक्ता नितेश कराडे सर आणि तेलंगणा सरकारच्या पंचायत राज, ग्रामविकास, ग्रामीण पाणी पुरवठा व महिला बालकल्याण मंत्री दानसारी अनुसया (सीताक्का) यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्यासाठी मते मागितली.

यावेळी मंचावर प्रमुख वक्ते
नितेश कराडे सर व तेलंगणा सरकारच्या पंचायत राज, ग्रामविकास, ग्रामीण पाणी पुरवठा व महिला बालकल्याण मंत्री दानसारी अनुसया (सीताक्का), पोन्नम प्रभाकर मागासवर्गीय मंत्री, सुरेखा कोंडा वन मंत्री ,महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत, माजी आमदार जैनुद्दीन झवेरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बेबी ताई ऊईके,शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, माजी गटनेते देवेंद्र आर्य सह आदी नेते उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते नितीश कराडे सर म्हणाले की सुधीर भाऊ म्हणाले की, मी गेल्या 10 वर्षात हजारो कोटींची विकासकामे केली आहेत.मात्र ते श्रेत्रातील तरुणांना रोजगार देऊ शकले नाहीत.बंद पडलेले पॉवर हाऊस, प्लाउड कारखाना आणि बामणी प्रोटीन्स कंपनी सुरू करू शकलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत जागा आणि मते कमी झाल्यामुळे त्यांना लाडकी बहिनची आठवण झाली आणि त्यांनी लाडकी बहिन योजना सुरू केली.

त्यांच्या राजवटीत भाजपचे नेते करोडपती झाले आणि जनता रोडपति झाली.

येत्या 20 तारखेला हे डबल इंजिन भ्रष्ट सरकार उलथून टाकायचे आहे. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना प्रचंड मतांनी निवडून आणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे.

तसेच तेलंगणा सरकारच्या पंचायत राज, ग्रामविकास, ग्रामीण पाणीपुरवठा आणि महिला बालकल्याण मंत्री दानसारी अनसूया ( सीताक्का) यांनी तेलुगू भाषेत भाषण करताना महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीला महाविकास आघाडी चे दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, रिपाइं या पक्षांचे नेते व कार्यकर्ते तसेच तेलुगू भाषिक सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कांग्रेस पक्षाची यूथ विंग युवक काँग्रेस व एनएसयूच्या तर्फे बाइक रैली चे आयोजन

सभेपूर्वी कांग्रेस पक्षाची यूथ विंग
युवक काँग्रेस व एनएसयूच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून संपूर्ण शहराची प्रदक्षिणा केली.

रॅलीदरम्यान युवक काँग्रेस व एनएसयूचे नेते व कार्यकर्ते ने अब की बार संतोष रावत संतोष रावत, महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले.

बाईक रॅलीची सांगता सभेच्या ठिकाणी झाली.

Back to top button
error: Content is protected !!