A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणे (राजू बावडीवाले)वंदे भारत लाईव्ह न्यूज अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस हस्तगत तसेच दोन आरोपींकडून ०१ घरफोडीचा गुन्हा उघड

पुणे (राजू बावडीवाले)वंदे भारत लाईव्ह न्यूज अग्निशस्त्र व एक जिवंत काडतुस हस्तगत तसेच दोन आरोपींकडून ०१ घरफोडीचा गुन्हा उघड

दि. ०६/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस अधिकारी व स्टाफ असे रेकॉडवरील गुन्हेगार चेकिंग व लॉज चेकीग व अवैध्य धंद्यावर कारवाई करण्याकरिता गस्त करित असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर वित्ते यांना बातमी मिळाली की, विधीसंघर्षीत बालक हा कांबळे वस्ती, गणेशनगर धायरी येथील मैदानामध्ये थांबला असून त्याचेकडे पिस्तूल आहे. मिळाले बातमीप्रमाणे जावून विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून त्याचेकडुन कि. रु.४०५००/- चे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व एक पितळी काडतुस मिळुन आले आहे.
नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे तपास करता सदरचे पिस्तूल हे त्याने त्याचा साथीदार याचेकडुन घेतले असल्याचे सांगितले आहे. सदरचे पिस्तूल हे त्यांनी मध्यप्रदेश येथून आणले असल्याचे सांगीतले आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाणे, उत्तमनगर पोलीस ठाणे येथे दरोडा, दरोड्याचा प्रयल व अग्निशस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी याचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाकडे अग्निशस्त्राबाबत सिहंगड रोड पोलीस ठाणे गु.र.नं ७२३/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, युनीट ३. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत
तसेच सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५५६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवा. संजीव कळंबे यांनी तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल हॅन्डसेट मनोज आनंदा गायकवाड, वय २२ वर्षे, रा. हरगुडे निवास, तिसरा मजला, सणसवाडी, पुणे हा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने व त्याचे साथीदार दिपक टिका विश्वकर्मा वय २० वर्षे, रा. साईपार्क सोसा. स. नं. १४, तुकाराम नगर, पुणे व राजु बहादुर रा. गाडीतळ, हडपसर, पुणे यांनी मिळून सदरची घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड याचेकडून दाखल गुन्हयातील १०,०००/- रू चा एक मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे मनोज आनंदा गायकवाड व दिपक टिका विश्वकर्मा यांना पुढिल कारवाईकामी सिंहगड रोड पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच दाखल पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे
सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, श्री शैलेश बलकवडे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा श्री. निखिल पिंगळे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, श्री. रंगराव पवार, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, शरद वाकसे, गणेश सुतार, विनोद भंडलकर, सुजित पवार, संजीव कळंबे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, हरिश गायकवाड, इसाक पठाण व महिला पोलीस अंमलदार सोनम नेवसे यांनी कानगिरी केली.

Vande Bharat Live Tv News
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!