प्रेस नोट
नागपूर शहर प्रतिनिधि
दि:-18/12/2024
जनग्रामीण पत्रकार संघ व वर्किंग जर्नलिस्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पत्रकारांना न्याय व हक्क मिळावेत यासाठी दी.18/12/2024 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला.
आज वर्किंग जर्नलिस्ट युनियनचे अध्यक्ष निशांत भाई यांचा अध्यक्षतेखालील आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यासोबत जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुध्धा उपस्थित होते.त्यांच्यासोबतचे आपल्या ग्रामीण भागातील पत्रकार, तसेच काही नवोदित पत्रकार उपस्थित होते.
यासाठी त्यांनी काही प्रमुख मागण्या आपल्याला खालीलप्रमाणे दिल्या आहेत.
१) पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. दाखल गुन्हे जलद गती न्यायालयात ठेवण्यात यावे.
२) कमीत कमी पंधरा वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला वयाच्या ५८ वर्षापासून पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
३) जुन्या अधिस्वीकृती धोरणातील जाचक अटी तत्काळ बदल करून, ५ वर्षे वरील नोंदणीकृत असलेल्या वृत्तपत्रांना व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी.
४) राज्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी.
५) न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल यांची आदर्श आचारसंहिता तयार करून त्यांना सुध्धा शासकिय जाहिराती व अधिस्वीकृती देण्यात यावी.
६) केंद्र सरकारातील डिजिटल मीडियाच्या नोंदणी कायद्यात सुयोग्य बदल करून अधिकृत मान्यता देऊन अधिस्वीकृती देण्यात यावी.
७) राज्यातील प्रत्येक जिल्हयात पत्रकार बांधवांना वसाहतीसाठी शासकिय जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
८) सुप्रसिद्ध दैनिकात काम करण्याऱ्या पत्रकार बांधव व कर्मचाऱ्यांना वेतन व इतर सुविधांसाठी योजना तयार करणे.
९) जुन्या सरकारी जाहिरात योजनेत जाचक अटी तात्काळ बदल करून दैनिक, साप्ताहिक व पाक्षिक यांच्यासाठी पाच वर्षावरील नोंदणीकृत वृत्तपत्राना सरकारी जाहिराती देण्यात याव्या.
१०) माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे वृत्तपत्रातील पत्रकार बांधवांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनांना सूट देण्यात यावी.
याचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र गंगाधरराव फडणवीस,महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आलेल्या प्रतिनीधीकडे सोपविण्यात आले.
वंदे भारत लाइव टीवी न्यूज नागपुर
सम्पादक
दिल्ली क्राईम प्रेस, नागपुर
विज्ञापन सहयोगी
प्लॉट नं.18/19, फ्लैट नं.201, हार्मनी एम्पोराईज पायल पल्लवी सोसायटी न्यू मनीष नगर सोमलवाडा नागपूर -440015, सम्पर्क नं:- ९४२२४२८११०/९१४६०९५५३६