A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorized

28 जानेवारीला पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, चंद्रपूर व राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा मंगळवार, दि. 28 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता, राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर येथे पार पडणार आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी आदी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यात 450 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून चंद्रपूर येथे रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राच्या झेराक्सच्या तीन प्रतीसह उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी तसेच ऑनलाइन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सदर मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी होवून मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

या नामांकित कंपन्याचा असणार समावेश : मल्टीव्हेव पॉलिफायबर चंद्रपूर या कंपनीकडून लूम ऑपरेटर, हेल्पर, अकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन क्वॉलिटी सुपरवायझर आणि क्लिनर. जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस, चंद्रपूर या कंपनीकडून वेल्डर आणि फिटर. एस.बी.आय.लाईफ इंन्शुरन्स, चंद्रपूरकडून फिल्डवर्कर आणि इंन्शुरन्स ॲडवायझर. संसूर सृष्टी इंडिया प्रा.लि.चंद्रपूर या कंपनीकडून फिल्ड एक्झेक्यूटिव्ह तर विदर्भ क्लिक सोल्युशन या कंपनीकडून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आदी कंपन्याचा समावेश असून या कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडून कळविण्यात आले आहे.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!