संजय क. पारधी बल्लारपुर
बल्लारपूर : सूर्यवंशी एंटरप्रायझेस चंद्रपूर मार्फत बल्लारपूर नगर परिषदेच्या अग्निशमन कार्यालयात नगर परिषद मार्फ़त कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु कंत्राटदार पूर्ण पगार आणि पेमेंट स्लिप वेळेवर देत नाही, पीएफ जमा करत नाही, रिकाम्या कॅश व्हाउचरवर जबरदस्तीने सह्या घेत आहे आणि करारावर स्वाक्षरी न केल्या वर. कामातून कमी करण्याचे धमकी देणे, आपले चंद्रपूर कार्यालयात स्वाक्षरीसाठी बोलावणे, कामगारांशी गैरवर्तन करणे इत्यादी तक्रारी सातत्याने येत आहेत. आज ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ या दोन महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सूर्यवंशी एंटरप्रायजेस च्या करार नामा रद्द करुन कठोर कार्रवाई करण्याची मागणि भाजप कामगार आघाडीचे राज्य सरचिटणीस अजय दुबे यांनी आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि मुख्याधिकारी विशाल वाघ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे