
वंदे भारत लाईव टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा :- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे भारतीय जनता पार्टी व आशिष ताजने मित्रपरिवार यांच्यातर्फे नवनिर्वाचित आमदार देवरावदादा भोंगळे व अर्चनाताई भोंगळे यांचा सहपत्नीक नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नारंडा गावाने कायमच भाजपवर प्रेम केलं आहे. पंडीत दिनदयाल उपाध्यायजींनी मांडलेला अंत्योदयाच्या उन्नतीचा विचार घेऊन या भागातील आमचा प्रत्येक कार्यकर्ता लोकसेवेत आहे. तळागाळातील शेवटच्या समाजघटकाच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण व्हावा यासाठी झटणे हाच भाजपचा मुलभाव ही आहे आणि तोच सेवाभाव घेऊन मी देखील नारंडा परिसरातील नागरिकांच्या सेवेत कायम राहील. तसेच आपण नारंडा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू असे अध्यक्षस्थानी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी प्रतिपादन केले.
आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते नारंडा गावातील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण, व्यायाम शाळा इमारतीचे लोकार्पण,वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत नारंडा गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले.
तत्पूर्वी नारंडा गावामध्ये मध्ये भव्य दिव्य अशी आमदार देवराव भोंगळे व अर्चनाताई भोंगळे यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा महामंत्री विवेक बोढे,चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारस पिंपळकर भाजपा नेते सुनील बाम व अनुपम जोगी विशेष सत्कार आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी करून विधानसभा निवडणुकीचा लेखाजोखा आमदार देवराव भोंगळे यांच्यासमोर मांडला व नारंडा क्षेत्रातील विविध समस्या सोडवाव्या व विकास कामांची मागणी आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे केली.
तसेच यावेळी जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमाला भरोसा भोयेगाव, इरई बोरगाव गाडेगाव विरूर,सांगोडा,हिरापूर,आवाळपूर, कढोली खुर्द, असान खुर्द, बोरी नवेगाव,वनोजा अंतरगाव बु, लोणी, पिपरी,माथा,शेरज खुर्द, शेरज बु, हेटी, कोडशी खुर्द, तांबाडी, गांधीनगर, तुकडोजी नगर, कोडशी बु, बोरगाव खुर्द,येथील नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी मंचावर अर्चना भोंगळे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, तालुका महामंत्री प्रमोद कोडापे, नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंचा अनुताई ताजने, उपसरपंच बाळा पावडे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, माजी सरपंच महादेव खाडे,नागोबा पाटील उरकुडे,रवी बंडीवार, शशिकांत आडकीने, पारस पिंपळकर, प्रमोद पायघन, दिनेश सूर, बापुजी पिंपळकर, अविनाश वाभीटकर, संजय पिंपळशेंडे, माजी सरपंच वसंता ताजने , ग्रा.पं.सदस्य अनिल शेंडे, ग्रा.पं.सदस्य रुपालीताई उरकुडे, ग्रा.पं.सदस्य शालूताई हेपट,सुनील बाम, अनुप जोगी, अनिल शेंडे,रमेश पाटील पावडे,मनोहर पाटील बोबडे,मिलिंद पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
सत्यवान चमाटे,मारोती शेंडे,मारोती बोबडे,अनिल निरे, सुरेश शेंडे,प्रमोद शेंडे,महेश बोलोरिया, गजानन चतुरकर, प्रशांत पंदिलवार,भिकाजी घुगुल,सूर्यभान सोनपितरे,आशिष ढुमणे,विनोद काथवटे, ज्ञानेश्वर वासेकर, गौरव वांढरे,वैभव गाडगे,निखिल ताजने,गौरव वांढरे,हर्षल चामाटे,अंकित ठाकरे,संकेत गाडगे,राजू परसूटकर,संतोष वांढरे,बाळा गाडगे, मंगल खाडे,देवानंद सोनुले,अर्जुन हेपट, शंकर बोढे,राजेंद्र आगलावे, रवींद्र आगलावे, बाळा तिखट, राजू तिखट, संदीप चौधरी, हुसेन सुरपाम, मनोज शेंडे, कवडू उरकुडे, प्रदीप उरकुडे, मंगल उरकुडे, प्रशांत काळे,बापूराव मोहुर्ले,भास्कर आत्राम,अजय वांढरे, कुणाल मोहितकर,चंद्रभान चामाटे,प्रकाश हेपट, सुरेश मुद्दलवार,प्रकाश हेपट, वसंता बहिरे,निखिल उपासे, विनोद कुचनकर,रजत रणदिवे,सुरज लोणबले,विठ्ठल निमकर,राकेश मोडक,शंकर कारेकर, शंकर सिडाम, साहिल काळे,रोशन पटदुखे, लुकेश ढवळे, सचिन काकडे,संतोष ताजने,यांनी अथक परिश्रम केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभार प्रदर्शन अरविंद खाडे यांनी केले कार्यक्रमाला नारंडा गावातील नागरिकांची व महिलांची व युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.