![](https://vandebharatlivetvnews.com/wp-content/uploads/2025/01/Blue-Red-Modern-Breaking-News-YouTube-Intro.gif३३.gif)
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
राजुरा येथील भवानी नाल्यातून रेतीतस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रेतीसह ३ ट्रॅक्टर पकडले. यावेळी विनापरवाना रेतीवाहतूक करीत असल्याचे आढळले. राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील भवानी नाल्यातील रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालक वर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत रेती, ३ ट्रॅक्टरसह २१ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास केली. या कारवाईत ट्रॅक्टर चालक मालक प्रतिक गणेश पिपरे (२४) पेट वॉर्ड राजुरा, चंद्रकांत भगवान कुयटे (४७) सोमनाथपुरा वॉर्ड राजुरा, विशाल नागेश मडावी (२५) सोमनाथपुरा वॉर्ड राजुरा यांच्या ताब्यातून ३ ट्रॅक्टरसह २१ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कलम ३०३(२) बीएनएस सहकलम ४८(७),४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ सहकलम १,२,३ गौण खनिज अधिनियम १९५२ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काँक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार सह अधिकारी आणि अंमलदारानी केले.