
आज दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी 03:30 सुमारास रासकर पार्क गुजरवाडी रोड कात्रज या भागामध्ये अचानकपणे मिरॅकल इलेक्ट्रिक दुचाकीच्या गोडाऊनला भीषण आग लागली. प्राथमिक माहिती मध्ये या गोडाऊन मध्ये करोडो रुपयाचे नुकसान झाले असून इलेक्ट्रिक दूचाकीच्या सर्व इलेक्ट्रिकल पार्ट्स बॅटरी, मोटर, इलेक्ट्रिक दुचाकी, दुचाकीचे साचे, चाके, टायर्स व लागणारे मौल्यवान फॅब्रिक्स हे या गोडाऊनमध्ये अगदी काही तासातच जळून खाक झाले. या घटनास्थळी अग्निशामकाच्या अनेक गाड्या तात्कळ पोहोचल्या तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पीआय खिलारे सर व पोलीस स्टाफ ही या ठिकाणी तात्काळ पोहोचले आग एवढी भीषण होती की आग विजवण्यासाठी लागणारे पाणी हे अग्निशामक गाड्या बरोबरच स्थानिक गावातील गावकऱ्यांच्या मार्फत टँकरद्वारे पुरवण्यात आले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून. आग आटोक्यात सायंकाळी 06:45 च्या दरम्यान आली प्राथमिक माहिती मध्ये या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे संबंधित गोडाऊनच्या कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले.



