
संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र
चंद्रपूर : प्रा. संगीता आर.बांबोडे एक खेळाडू व्यक्तिमहत्व आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी व समाजासाठी खूप चांगल कार्य केले आहे .त्यांच शिक्षण हे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पूर्ण केलं. शिकत असतांना त्यांना खेळामध्ये व समाजकार्यामध्ये खूप आवड होती,अजूनही त्या समाजामध्ये कार्यरत आहे. त्या विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत समाजामध्ये त्यांचे पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य सूरू आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे. जानेवारी २०२५ मध्ये मेंगलोर कर्नाटका येथे झालेल्या आशियन मास्टर अथलॅटिक्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनाच्या कार्यकारी सचिव, चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटनेच्या सदस्य, भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटनेच्या सचिव आहे. त्यांचा या कार्याची दखल घेत अविष्कार फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे हा राज्य स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार महिला दिनानिमित्त समाजामध्ये उत्कुष्ट कार्य करणाऱ्यांना देण्यात आला आहे. दिनांक १६ मार्च २०२५ ला नागपूर येथे या पुरस्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अविष्कार फाउंडेशन चे राष्ट्रिय अध्यक्ष संजय पवार , उत्तर भारत विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक कापटा व नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. या सर्वांचे श्रेय बांबोडे परिवार आणि विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा द्वारा संचालित संस्थेचे सर्व पदाधिकारी, विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंद यांना दिले आहे .
विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, अभिजीत बोतले, राजेंद्र गावंडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार करवंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, डॉ. अनिता लोखंडे, डॉ. राकेश तिवारी, डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. दिलीप जयस्वाल, सुरेश अडपेवार, विनोद यादव, योगेश करमनकर, गौतम देवगडे, वंदना देवगडे, डॉ.दिलीप बगडे, डॉ. यशवंत घुमे, प्रा. रसिकलाल वारकरी, डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. माला प्रेमचंद, डॉ. आनंद नीते, डॉ. अनिस खान, विजय लांबट, दिलीप मोडक, एडवोकेट मिलिंद रायपुरे, किशोर चिंचोलकर, विजय डोबाळे, जयश्री देवकर, संतोष निंबाळकर, युवराज भारती, राजेश मत्ते, दिनेश गोंडे, सुनिता खंडाळकर, संघमित्रा बांबोडे, संघपाल बांबोडे, प्रीती बांबोडे, संध्या दुधे, सुनिता तोडसाम, पायल तोडसाम पूर्वा खेरकर, शितल मांडवकर, विठ्ठल मांडवकर, वर्षा कोयचाडे, आचल उरकुडे, प्रियंका मांढरे, अर्चना मांढरे, स्नेहल राऊत, सुरज इंदुरकर, लता इंदूरकर, प्रफुल पतरंगे, विद्या किन्नाके, अलोका विश्वास, कोमल वाकडे, प्रशांत निकोडे, शिल्पा तिवारी, उमेश मुसावत, सुनिताताई खंडाळकर, ममता सारडा, सोनल उमाटे, बादल बेले, साक्षी मशाखेत्री, श्रुती कामतवार, कीर्ती आराडे, शालिनी खिरडकर आदींनी प्राध्यापिका संगिता आर.बांबोडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.