
संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे 66वी वरिष्ठ राज्य गादी / माती विभाग व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत दिनांक 26 मार्च ते 30 मार्च 2025 या कालावधीत कर्जत जि.अहिल्यानगर (अहमदनगर) येथे होत आहे.
चंद्रपूर जिल्हा गादी/ माती विभाग संघ अहिल्यानगर येथे 66 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्तीस्पर्धेत जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करतील. गादी विभाग कुस्तीगीर:- १) ५७ किलो संदिप चव्हाण २) ६५ किलो शाबाजखान पठाण ३) ७० किलो दिपक पोद्दार ४) ७४ किलो योगेश बानकर ५) ७९ किलो सागर भेदोडकर ६) ८६ किलो —— ७) ९७ किलो —— ८) १२५ किलो अमोल ठेंगरी माती विभाग कुस्तीगीर:- १) ५७ किलो गणराज निखाडे २) ६१ किलो —— ३) ६५ किलो —— ४) ७० किलो —– ५) ७४ किलो विनय दिवटे ६) ७९ किलो चेतन दिवटे ७) ८६ किलो गणेश धनजुळे ८) ९२ किलो चेतन वाणी ९) १२५ किलो विनीत मेश्राम
आदिचा समावेश आहे . जिल्हा संघ २५ मार्च ला अहिल्यानगरला रवाना होईल. अध्यक्ष -शरद टेकुलवार , उपाध्यक्ष- राजेश सोलापन, उपाध्यक्ष- आर .एस.फुलकर, सचिव- छगन पडगेलवार, कोषाध्यक्ष- गजानन क्षीरसागर, सदस्य- सुभाष लांजेकर, विनोद दिवटे प्रतिनीधी मुरलीधर टेकुलवार व चंद्रशेखर पडगेलवार. सदस्य-उदय अंबिरवार, अमर टेकुलवार, शुभम अंबिरवार, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या