
संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर : योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरचे जनक भाई श्री गोपालजी मुदंडा जिल्हाप्रमुख सुरेश घोडके महिला जिल्हाप्रमुख किशोरीताई हिरुळकर यांचे मार्गदर्शनात योग नृत्य मुख्यालय पोलीस फुटबॉल ग्राउंड तर्फे महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परम पूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे प्रसिद्धी प्रमुख व शिबिर प्रमुख अशोक पडगिलवार, अरुण जुनगरे, सतीश रेड्डी, जगदीश चव्हाणदे, अविनाश मडावी ,दिवाकर लांडगे, गणेश जाधव, इत्यादी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती निकिता तागडे, तिने संविधानाबद्दल विस्तृत माहिती दिली तर अशोक पडगिलवारतर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांचे फोटोस मान्यवराच्या हस्तेे पुष्पहार टाकून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सूत्रसंचालन सीमा मळावी हिने तर आभार प्रदर्शन श्रद्धा शिमगेकर न हिने मांणले, कडू कर ताईने गीत गायनाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे उप मीडिया प्रभारी विठ्ठल देशमुख यांनी कळवलेले आहे