
प्रेस विज्ञप्ति
सह्याद्रि अतिथिगृह, मुंबई
पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करून पूर रेषेची मार्गदर्शक तत्त्वे नव्याने निश्चित करावीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि कुळगाव-बदलापूर परिसरातील विकास प्रकल्पांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश-
✅ उल्हास नदीकिनारी नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन, जेथे अनेक वर्षे पूराचा धोका जाणवलेला नाही, त्याभागात जलसंपदा विभागाला नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश
✅ कुळगाव-बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिज संदर्भात एमएमआरडीएने आवश्यक कार्यवाही करावी आणि दत्त चौक ते समर्थनगरपर्यंत रेल्वे लाईनला समांतर ओव्हरब्रिज बांधण्याची प्रक्रिया नगरपरिषदेने तातडीने पूर्ण करावी
✅ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या सॅटिस प्रकल्पास आणि गॅरेज रोड ते होपलाईन पॉवर हाऊस पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामास गती द्यावी
✅ कांजूरमार्ग – ऐरोली – शिळ फाटा – कटाई – बदलापूर मेट्रो प्रकल्पाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
✅ बदलापूर शहरासाठी प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास आवश्यक जागेस तातडीने मान्यता देण्याचे एमएमआरडीएला निर्देश
✅ कुळगाव पोलीस स्टेशनसाठी एमआयडीसीच्या जागेबाबत गृह विभागाने प्रस्ताव सादर करून तातडीने मंजूरी देण्याचे निर्देश
✅ कुळगावमधील खाजगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगरपरिषदेने चालवण्यास घ्यावी
या बैठकीला आ. किसन कथोरे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संबंधित विभागांचे सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015