A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

जिल्ह्यात वाकेश्वर गाव आदर्श ठरणार- प्रा. सुरज गोंडाणे माझं गाव सुंदर गाव माझी जबाबदारी अंतर्गत ५०० नारळाचे वृक्षारोपण

जिल्ह्यात वाकेश्वर गाव आदर्श ठरणार- प्रा. सुरज गोंडाणे माझं गाव सुंदर गाव माझी जबाबदारी अंतर्गत ५०० नारळाचे वृक्षारोपण

           प्रेस विज्ञप्ति 
        हनुमान देवस्थान वाकेश्वर 
            भंडारा 

जिल्ह्यात वाकेश्वर गाव आदर्श ठरणार- प्रा. सुरज गोंडाणे
माझं गाव सुंदर गाव माझी जबाबदारी अंतर्गत ५०० नारळाचे वृक्षारोपण

भंडारा:- वाकेश्वर येथे लोक सहभागातून व युवा संकल्पनेतुन माझं गाव सुंदर गाव- माझी जबाबदारी ही संकल्पना मनामध्ये रूजवुन गावात ५०० नारळ वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. प्रत्येक गावाची आगळी वेगळी ओळख असल्यावरच त्या गावाला महत्त्व येत असते. हे आपल्याला कोरोणा कोव्हिड या संसर्गजन्य आजाराने दाखवून दिले. म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी आबालवृद्ध एकवटले आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात वाकेश्वर गाव आदर्श ठरणार असल्याचे असे प्रतिपादन प्रा. सुरज गोंडाणे यांनी केले .
ते युवा संघटना व समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक १३ जुलै २०२५ ला हनुमान देवस्थान वाकेश्वर च्या भव्य आवारात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. सुरज गोंडाणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच लुहास गोंडाणे होते. प्रमूख म्हणून पंचायत समिती सदस्य सिमा रामटेके, माजी पंचायत समिती सदस्य अरूण गोंडाणे, नंदगोपाल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सुहानी फुलबांधे, माजी सरपंच मारोती मस्के, पोलीस पाटील श्रीराम मुटकुरे, राजू हलमारे, नुतन मस्के, आशा कुथे, ग्राम सचिव विजया आकरे, पिंटु मस्के, दादु डहाके, कृषी सहाय्यक रोशन भोयर, प्रतिक क्षिरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
काही समाज कंटक हे विनाकारण वृक्षांचा नाश करत असतात. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग सारख्या विविध समस्या निर्माण होत उद्भवत आहेत. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नंदगोपाल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले. वाकेश्वर येथे ५०० नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले. गावाच्या हितासाठी नियोजन बद्ध आराखडा, फायदे, नफा, तोटा या सुक्ष्म नियोजन युवा संघटना व समस्त ग्रामवासी यांच्या सहकार्याने केला आहे. म्हणून खूप झाल्या घोषणा आता, खूप झाले समाज कारण, वृक्ष लावा एकतरी, होईल मग पर्यावरण रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणार असे प्रतिपादन सरपंच लुहास गोंडाणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल चोले व प्रास्ताविक राजू हलमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार लक्ष्मीकांत डहाके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सचिन पारधी, महेन्द्र भेदे, यशवंत बोरकर, चेतन बारई, निवृत्ती भेदे, सोनु क्षिरसागर, सुंदरलाल मेघवानी, छगन मते, एकनाथ कुथे, मंगेश हलमारे, विक्की जिभकाटे, गुरूदेव भेदे, नमन खरवडे, निखिल कुथे, ओमप्रकाश लांजेवार, प्रफुल्ल खरवडे, राजू हटवार, शैलेश गोंडाणे व युवा संघटना तसेच समस्त वाकेश्वर सर्व ग्रामवासी यांनी सहकार्य केले.

 Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

[yop_poll id="10"]
Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!