
:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपुर यांच्या सौजन्याने तालुका क्रीडा संकुल, विसापूर (बल्लारपूर) येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या मनपा स्तरीय कुस्ती स्पर्धेत मुरलीधर बागला हायस्कूल, चंद्रपूर येथील विद्यार्थीनी कु. लक्ष्मी पटेल हिने १४ वर्ष आतील ४२ किग्रा वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला त्याच प्रमाणे नागपूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेत चंद्रपूरचा प्रतिनिधित्व करणार. या विजयी कामगिरी वर मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर यांनी विद्यार्थीनी खेळाडूचे कौतुक केले. तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, व सर्व कर्मचारी वर्ग यांनी खूप खुप अभिनंदन केले व समोर होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे कु. लक्ष्मी पटेल हिला NIS कुस्ती कोच श्री. मुकेश पाण्डेय सर यांचा मार्गदर्शन व शिक्षिका सौ. प्रांजली गर्गेलवर मैडम यांचा मार्गदर्शन लाभला. खेळाडूनी आपल्या विजयाचा श्रेय कोच श्री. मुकेश पाण्डेय सर व आपल्या आई वडिलांना दिले.