
संजय पारधी
चंद्रपूर : मागील वर्षी श्री महर्षी विद्या मंदिर येथे प्ले डेट ला पालकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादा ला बघता यावर्षी सुद्धा श्री महर्षी विद्या मंदिर , दाताळा , चंद्रपूर ने प्ले डेट 2.0 चे आयोजन केले आहे. हा प्ले डेट 2.0 कार्यक्रम दि . 1 मार्च 2026 ला सकाळी 9:30 वाजता शाळेच्या आवारात सुरु होणार आहे. यामध्ये वयोगट 2 ते 7 वर्ष यामधील मुले सहभागी असणार आहेत. फक्त २०० रुपये मध्ये पालकांना आपल्या मुलांची नोंदणी करून या सुवर्णसंधी चा लाभ घेता येईल. श्री महर्षी विद्या मंदिर , दाताला तसेच सिविल लाईन्स ब्रांच मध्ये नोंदणी सुरु आहे. प्ले डेट म्हणजे समान वयाच्या मुलांनी एकत्र येणे , एकमेकांशी खेळणे तसेच स्वतःला इतर मुलांसोबत जुळवून घेणे आहे. प्ले डेट मध्ये मुलांना संवाद , सहानुभूती आणि संघर्ष निराकरण, व्यक्तिमत्व विकास इत्यादी आवश्यक जीवन कौशल्ये शिकण्यास तसेच विकसित करण्यास मदत होते.
या संपूर्ण प्ले डेट 2.0 मध्ये मुलांसाठी विविध ऍक्टिव्हिटी आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये पावर प्ले पार्क , ग्रूव्ह अँड गिगल्स , टिनी हॅन्ड्स स्टुडिओ , सेंसॉरीं वंडरलँड , हैप्पी हार्ट्स हब , डिस्कवरी डेन , कलर स्प्लॅश स्टुडिओ , ब्रेनी बडीज लॅब , लिटिल मॅथेमॅटिकस स्टुडिओ आहेत. या संपूर्ण ऍक्टिव्हिटीज चा आनंद मुलांना घेता येईल.
श्री महर्षी विद्या मंदिर चे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक यांनी चंद्रपूर मधील पालकांना या प्ले डेट 2.0 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.








