A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करणेसाठी सहकार्य करणेबाबत.*

बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करणेसाठी सहकार्य करणेबाबत.*

नागपूर प्रतिनिधि

प्रति,
सन्मा. संवेदनशील बंधू /भगिंनीनो.
महाराष्ट्र राज्य

*विषय….बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करणेसाठी सहकार्य करणेबाबत.*

महोदय,

मी या पत्राद्वारे विनंती करतो की, आपल्या समाजात वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी १४ वर्षा पेक्षा कमी तसेच धोकादायक कामावर १८ वर्षा पेक्षा लहान बालकांना बाल कामगार (प्रतिबंध व नियमन)अधिनियम, २०१६ या कायद्यानुसार कामावर ठेवणे गुन्हा आहे. (कामाची ठिकाणे उदा- वीटभट्टी, कारखाने, हॉटेल, दुकान, ऊसतोड कामगार, बाल भिक्षेकरी इ…..) बालकामगार कामावर ठेवल्यास मालकाला कायद्यानुसार ०६ महिन्याचा तुरुंगवास व दंडात्मक कार्यवाही केली जाते. एकादा मुलगा बाल कामगार म्हणून काम करताना त्या ठिकाणी स्वतचा मुलगा /मुलगी मजूर म्हणून काम करत आहे, असे चित्र डोळ्यासमोर आणा. बघा मनाला खूप वाईट वाटतंय ना? मग समाजातील एक संवेदनशील आणि जागरूक नागरिक म्हणून, तुम्ही एक किंवा जास्त बाल कामगार आढळून आल्यास गुगल मॅप वर फोटो/व्हिडिओ काढा आणि आपल्या जिल्हा बाल संरक्षण समिती/ तालुका बाल संरक्षण समिती/ग्राम बाल संरक्षण समितीच्या अध्यक्ष. सचिव. याच्या मोबाईल नंबर ( व्हॉट्स ॲप नंबर) पाठवून द्या. (मात्र तुम्ही काढलेला फोटो.व्हिडिओ प्रसिद्ध करू नका .) सोलापूर जिल्ह्य़ातील बाल संरक्षण अधिकारी श्री.अतुल वाघमारे यांचा मोबाईल नंबर 7219104503 हा त्यांनी फक्त सोलापूर जिल्ह्य़ातील जनतेसाठी (इतर जिल्ह्य़ातील लोकांनी या नंबर वर फोटो/व्हिडिओ टाकू नये) उपलब्ध करून दिला आहे . त्यांच्या मोबाईलवर फोटो/व्हिडिओ पाठवा. असे जाहीर केले आहे. (मात्र फोटो/व्हिडिओ प्रसिद्ध करू नका तो गुन्हा आहे.) आमच्याकडे फोटो/व्हिडिओ आल्यावर शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने सोलापूर जिल्ह्य़ातील बाल कामगार मुक्त करण्यात येतील. (खूप अभिनंदन श्री. वाघमारे साहेबांचे)आपण ही आपल्या जिल्ह्य़ातील बाल संरक्षण अधिकारांचे नांव. मोबाईल नंबर वर असे बाल कामगार आढळून फोटो/व्हिडिओ काढून बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याबाबत पुढाकार घेऊन सहकार्य करावे अशी विनंती.

आपला
प्रमोद झिंजाडे.
मोबाईल. 7775903052
महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा
जि.सोलापूर.
दिनांक :- ०९.०७.२०२४

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!