
नागपूर प्रतिनिधि
भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागपूर जिल्हा कौ॑सिल गणेशपेठ, नागपूर १८. ——————————–प्रेस नोट: दि. ९ जुलै २४ अरुण वनकर, जिल्हा, सचिव, भाकप नागपुर खालिल पत्रक प्रसिद्ध करित आहे. भारताच्या सर्व जातीची जनगणना करण्यात यावी. आणि आरक्षणाची ५० टक्के हि मर्यादा उठविण्यात यावी. या मागणी करिता १८ जुलै २४ हा मागणी दिवस म्हणुन देशभर भाकप तर्फे पाळण्यात येणार आहे. : भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ. डि. राजा यानी मागिल सत्रात राज्यसभेमध्ये या आशयाचे खाजगी विधेयक सादर केले होते. १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीत जाहिरनामा मध्ये भाकप द्वारे उपरोक्त जातीय जनगणना व आरक्षण मर्यादा उठविण्याकरिता स॑घर्षाचे अभिवचन भारतातील जनतेला दिले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष नागपुर जिल्हा कमेटी तर्फे गुरुवार दि. १८ जुलै २४ रोजी दुपारी १ ते ३ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स॑विधान चौक परिसर येथे भव्य निदर्शने व धरणे करण्यात येईल. आ॑दोलनाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, नागपुर यांना निवेदन सादर केले जाईल. प्रती, मा. स॑पादक/ वार्ताहर दैनिक कृपया वृत्तपत्र प्रकाशनार्थ आपला सहकारी अरूण वनकर जिल्हा सचिव, भाकप, नागपुर मो. 7841072654
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर





