A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

*श्री रुख्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुरात दाखल* *भव्य दहीहंडी सोहळा संपन्न*

*श्री रुख्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुरात दाखल* *भव्य दहीहंडी सोहळा संपन्न*

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

*श्री रुख्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुरात दाखल*
*भव्य दहीहंडी सोहळा संपन्न*

आज दिनांक २२ जुलै २४ रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथे भव्य दहीहंडी उत्सव संपन्न झाला.दरवर्षी प्रमाणे श्री रुख्मिणी मातेच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर साठी दिनांक १२ जुन रोजी प्रस्थान झाले होते संत सद्गुरू श्री सदाराम महाराजांनी सुरू केलेल्या पालखीचे हे ४३० वे वर्ष आहे. मानाच्या पालख्यापैकी एक असलेली विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी दिनांक २१ जुलै रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथे परत आली दरवर्षी प्रमाणे प्रतिपदेला दहीहंडी सोहळा हजारो वारकऱ्यांचे उपस्थितीत संपन्न झाला त्या निमित्त सकाळीं श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा संपन्न झाली नंतर पालखी परत आल्यावर पादुकांचा अभिषेक व आरती झाली. संस्थानं तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.नंतर श्री हभप पंकज महाराज महल्ले यांचे कीर्तन ,जगतगुरु राज राजेश्वर माऊली यांचे उदबोधन झाले , कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आमदार व माजी पालकमंत्री श्रीमती यशोमती ताई ठाकूर यांचा संस्थानं तर्फे सचिव श्री सदानंद साधू,उपाध्यक्ष श्री वसंत. डाहे यांनी सत्कार केला,दुपारी ४ वाजता गोपळपुरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा पार पडला श्री सदानंद साधू सचिव तथा सोहळा प्रमुख ह्यांचे हस्ते तीर्थ उत्थापन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली,अध्यक्ष श्री नामदेवराव अमाळकर उपाध्यक्ष श्री वसंत डाहे विश्वस्त श्री हिम्मतराव टाकोणे श्री सुरेश काका चौहान,अशोकराव पवार अतुल ठाकरे हभप पंकज महाराज महल्ले , विणेकरी विठोबाची बागडे ,श्याम श्रीराव स्वप्नील जमखुटे,सर्वांचे उपस्थितीत पार पडला ह्या सोहळ्या ला पंचक्रोशीतील हजारो वारकरी आले होते अत्यंत भक्तिमय वातावरणात व आई रुख्मिणी मातेच्या व संत सद्गुरू सदाराम महाराजांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला भक्तिमय वातावरणात पार दहीहंडी उत्सव पार पडला सोहळ्याला श्री सदानंद साधू सचिव तथा सोहळा प्रमुख ,अध्यक्ष श्री नामदेवराव अमाळकर उपाध्यक्ष श्री वसंत डाहे विश्वस्त श्री हिम्मतराव टाकोणे श्री सुरेश काका चौहान,अशोकराव पवार अतुल ठाकरे सत्यनारायण चांडक ,श्री राजेशजी वानखडे,सौ वानखडे ताई, प्रेमदास राठोड सरपंच, सभापती कल्पनाताई , पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले होते.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

Back to top button
error: Content is protected !!