A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

योगनृत्य परिवार तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

भव्य गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच आयोजन

WhatsApp Image 2024 07 31 at 15.47.20

संजय पारधी बल्लारपूर

योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यलय चंद्रपूर तर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच आयोजन स्थानिक राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल चिंताडे प्रिन्सिपॉल RCERT, योगनृत्याचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा राधिकाजीं मुंधडा इत्यादी मान्यवारांची उपस्तिती होती सर्व प्रथम मान्यवरांना दिंडी द्वारे जय हरी विठ्ठल च्या जय घोष करीत सभास्थलि आणण्यात आले द्विप प्रज्वलन करून व स्वागत गीताद्वारे मान्यवारांचे स्वागत व पुष्प गुच्चं शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सोबतच जेष्ठ व श्रेष्ठयोगसाधक 70 वर्षावरील व 65 वर्षा वरील पति पत्नी चा पुष्प गुच्चं व भेट वस्तू देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले प्रस्ताविक आशिष झा सरं यांनी केले योगनृत्या मुळे स्वास्थच दिलनाही तर आपल्याला आई वडील भाऊ बहीण काका काकी मामाजी इत्यादी अनेक नाते या परिवारामुळे मिळाले असा अनेक नात्याचा परिवार ज्यामुळे लवकर उठण्याची सवय लावली शुद्ध हवेमुळे माईंड फ्रेश राहते आरोग्य ठीक राहते इत्यादीची माहिती दिली तर अध्यक्ष अनिल चिंताडे प्रिन्सिपॉल यांनी गुरुपौर्णिमेचं महत्व विषद करताना महर्षी व्यास श्रीकृष्ण यांच्या गुरु शिष्या बद्धल माहिती दिली कौरव पांडवाच्या युद्धात श्रीकृष्णाने दिलेल्या उपदेश्यामुळेच पांडवाचा विजय झाला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा प्रभारी सुरेश घोडके, जिल्हा महिला प्रभारी किशोरीताई हिरुडकर, प्रमोद बाविस्कर, प्रशांत कत्तुरवार्, प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगेलवार, सूरज घोडमारे, पूनम पिसे, सारिता दुर्गे, छाया हिरोळे इत्यादिनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला पाऊस चालू असतानाही विविध पारंपरिक खेळांत् भाग घेत मनोरंजना सोबतच आनंद घेतला चंद्रपूरातील सर्व केंद्र प्रमुख मंडळ प्रभारी सर्व पदाधिकारी पुरुष महिला 500 च्या उपस्तित होत्या उत्कृष्ट संचालन विजय घोंनमोडे तर आभार वैशाली बाविस्कर हिने मानले सह भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!