
संजय पारधी राजुरा महा.
कढोली : शिवजन्मोत्सव समिती कढोली (बु.) च्या वतीने कढोली गावात दोन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये दिनांक १८ फेब्रुवारी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते म्हणून ओळखले जाणारे अभिजित राजे (सांगलीकर) यांचं भव्य व्याख्यान ठेवण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी असलेले कढोली गावातील सरपंच मा.शैलेश चटके, उपसरपंच सुषमा उरकुडे, गावातील माजी सरपंच राकेश हिंगाणे, प्रमूख उपस्थिती संजय किंगरे व शिवजन्मोत्सव समिती चे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कमिटीतसेच १९ फेब्रुवारी ला कढोली गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत विशेष आकर्षण म्हणून गावातील भजन मंडळी सांगण्यात आले व लहान चिमुकल्यांनी शिव घोषण करत सहकार्य केले. त्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाटिका मधून लोकांपर्यंत पोहचवण्यात आला. व लहान चिमुकल्यांनी त्यांची कला, नृत्य व भाषण देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात सहभागी ज्ञानज्योती कॉन्व्हेन्ट चे मुख्याध्यापक निलेश सज्जनवार सर, सरपंच शैलेश चटके, उपसरपंच सुषमा उरकूडे, माजी सरपंच राकेश हींगाणे, महेश झाडे, किशोर झाडे व इतर ग्रामपंचायत कमिटी, तसेच शिवजन्मोत्सव समिती कढोली बु. चे कार्यकर्ते प्रतिक लोनगाडगे, सागर उरकुडे, ओमकार पायपरे,सचिन झाडे, रोहित टोंगे, पियूष हिंगाने, गणेश जेनेकर, रोहित झाडे, प्रतीक झाडे, तन्मय काळे, लोकेश आस्वले, मयूर आस्वले, मंथन हिंगाने, मयूर झाडे, किशोर झाडे, जीवन हिंगाने, ओम बोबडे,यश बोबडे,सहील उरकुडे व सर्व गावकरी मंडळी.