A2Z सभी खबर सभी जिले की

मानसी दरबारची राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड 

 

IMG 20251204 225157

चंद्रपूर :-

दिनांक ०७ ते १० डिसेंबर २०२५ कालावधीत नाशिक मध्ये इंडियन तायक्वांडो यांचे मान्यतेने व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारे कॅडेट ,सब ज्युनियर, ज्युनियर व सिनिअर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपुर्ण महाराट्रातून सर्व जिल्हे आप आपल्या जिल्हाच्या प्रतिनिधित्व करणार. त्याच प्रमाणे चंद्रपुर जिल्हा व सिटीच्या संघाची निवड चाचणी चंद्रपूर स्थानिक पैंथर्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये घेण्यात आली ज्या मध्ये डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोशिएशन ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. अमोल टेंभुर्णे सर त्याच प्रमाणे डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोशिएशनचे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. बजरंग वानखडे सर, सिटी तायक्वांडो असोसिएशनचे सचिव श्री. मुकेश पाण्डेय तसेच बाकी पदाधिकारी उपस्थित होते. या निवड चाचणीत एकूण १४ खेळाडूची निवड करण्यात आली. त्यामध्ये चंद्रपूर स्थानिक पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार – ४६ किग्रा मध्ये चंद्रपूर संघात आपली जागा पक्की केली. दिनांक ०६ डिसेंबरला हा संघ नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी रवाना होईल. कु. मानसी दरबारने आपल्या यशाचा श्रेय आपल्या आई वडील व कोच श्री मुकेश पाण्डेय यांना दिल्या. याच प्रसंगी मानसीला जिल्ह्याचे सचिव श्री. बजरंग वानखडे सर, श्री. उमेश पंधरे सर व श्री. संजय पारधी सराची खुप खुप अभिनंदन केला व समोर होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा दिल्या.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!