
बाभळेश्वर : श्री संत एकनाथ महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीचे वातावरणात संपन्न दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षांची निवड संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव पाटील म्हस्के यांनी केली तसेच अहवाल सालातील घडामोडीचे प्रास्ताविक त्यांनी केले व अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.पतसंस्थेमार्फत छोटे, मोठे व्यावसायिक ग्रामीण भागातील गरजूवंतांना व्यवसायास प्रोत्साहन मिळावे म्हणून कर्ज पुरवठा वितरित केला जातो तसेच या संस्थेत दैनिक मंगल ठेव, सेव्हिंग, फिक्स डिपॉझिट, लॉकर,सोनेतारण अशा सेवा उपलब्ध असून या माध्यमातून व्यवहार केले जातात संस्थेच्या अजेंड्यावर असणारे सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले.पतसंस्थेचे भाग भांडवल जवळपास एक कोटीच्या जवळपास आहे संस्थेचे सर्व व्यवहार पारदर्शक व व्यवहारात नियमितता असल्याने संस्थेस अ वर्ग दर्जा मिळालेला आहे तसेच या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रसंगी परिसरातील तसेच संस्थेची निगडित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील हुशार व होतकरू,नामवंतांचा सत्कार सन्मान करण्यात आला प्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली या पतसंस्थेची सभासद संख्या जवळपास सहाशे पर्यंत आहे मागील अहवाल वर्षात संस्थेला 38 लाख 32 हजार इतका नफा मिळालेला आहे वार्षिक सर्वसाधारण सभेचे अनेक मान्यवर ग्रामस्थ ठेवीदार कर्जदार व हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री विलास मामा पाटील खर्डे, बाळासाहेब थिगळे,श्री माधवराव कोरडे पाटील,श्री प्रमोद कदम,श्री राजेंद्र नालकर,श्री बाळासाहेब कांदळकर, श्री सुहास वैद्य सकाळ वार्ताहर, श्री अभिजित म्हस्के,श्री राजेंद्र पाटील म्हस्के, श्री सुधीर पाटील म्हस्के श्री राजेंद्र कुलकर्णी,आशीर पठाण, नदीम पठाण,डॉ.जेजुरकर,श्री मनोहर शिंपी,श्री ज्ञानेश्वर कांदळकर, प्रिंट मीडिया सेलचे श्री शहाजी दिघे,रामदास पाटील बेंद्रे, श्री अभिजीत साळवी,चंदूभाई तांबोळी, श्री निवृत्ती बनसोडे, श्री सतीश पवार श्री संदीप निबे, संस्थेचे ऑडिटर श्री सुरेश डौले साहेब, चंदूभाई तांबोळी, डॉ म्हस्के ताई,कु. आकांक्षा शेळके, डॉ पल्लवी बनसोडे, डॉ रश्मी म्हस्के, हिना पटेल, शुभांगी घोरपडे डॉ.श्री.केशवराव म्हस्के उपस्थित होते संस्थेचे सचिव श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मान्यवरांचे सत्कार केले व संस्थेचे मॅनेजर श्री संजय खंडागळे यांनी उपस्थिताचे आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक श्री संजू इनामके, श्री किरण कदम व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





