पुणे; अजित पवार यांच्या हस्ते भाजी मंडईचे नूतनीकरण
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर आदी उपस्थित होते.