पुणेः वाघोली दि डंपरच्या धडकेत तरुणीने गमवले पाय
दि 11 वाघोलीत डंपरच्या धडकेने एका तरुणीला दोन्ही पाय गमवावे लागले. हा अपघात सकाळी आठच्या सुमारास घडला. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला. मनीषा बाळासाहेब मंडलिक (वय २३, रा. वाघोली) ही तरुणी वाघोलीत पुणे-नगर महामार्गावरून रस्ता ओलांडत होती. छत्रपती श्री शिवाजी पुतळ्याजवळ तिला डंपरची धडक बसली. तिच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने ती विव्हळत होती. मनीषा यांनी रस्ता ओलांडताना डंपरला हात करून थांबण्यास सांगितले. मात्र तो न थांबल्याने धडक बसली, असे तिचे वडील बाळासाहेब मंडलिक यांनी सांगितले.