

अहिल्यानगर – आमदार संग्राम जगताप व मी शहर विकासाची संकल्पना हाती घेऊन मुहूर्तमेढ रोवली आणि विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या.या पुढील काळात चांगले काम उभे करू आणि समृद्ध नगरची निर्मिती करू.विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती पूर्णपणे सज्ज आहे.ते महायुतीचे उमेदवार असले तरी ते माझे मित्र आहेत.नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप ५० हजार मतांनी विजयी होतील.त्यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले काम केले असल्यामुळे मला कठीण परिस्थितीत देखील ३५ हजार मतांचे मताधिक्य दिले होते.आता तर चांगले वातावरण आहे.शहरात ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाते.त्यांनी केलेल्या विकास कामावर नगरकरांनी विश्वास ठेवला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
[yop_poll id="10"]





