पुणेः ३ महिन्यांत मेट्रोची कामे पूर्ण करण्याची सूचना
पुणे शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणेकरांना तासन्तास रस्त्यावर घालवावे लागत आहेत. त्यामुळे पोलिसांवरही ताण येत आहे. पुणे पोलिस प्रशासन आणि मेट्रो प्रशासनाची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. येत्या तीन महिन्यांत मेट्रोची कामे पूर्ण करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेट्रो प्रशासनाला बैठकीतून दिल्या