सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर वीरांगणांनी जन्म घेतला असून, त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यागाने या भूमीला अभिमान मिळवून दिला आहे. या थोर माता-भगिनींच्या उपकारांची जाणीव ठेवत महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान राखला आहे. आजही नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात मातृत्वाचा सन्मान केला आहे.
राज्य शासनाने चौथे महिला धोरण लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या धोरणाअंतर्गत शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. ही फक्त नियमांची अंमलबजावणी नसून मातृत्वाचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी दृष्टिकोन प्रकट होणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात माननीय मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या नावासोबत वडिलांआधी आईचे नाव प्राधान्याने घेतले. या कृतीने महाराष्ट्राने देशभरात मातृत्वाचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. मातृत्वाचा सन्मान जपण्याचा हा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी प्रेरणादायी ठरेल.