राजुरा :- चंद्रपूर सिडीसीसी बैंक नोकर भरतीत हजारो परीक्षार्थीची फसवणूक
गंभीर :- सीडीसीसी बैंक भरती परीक्षा घोटाळा विधिमंडळात आमदार भोंगळे यांनी गाजवला.
बैंक अध्यक्ष, संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीच्या व्यवस्थापणाची नार्को टेस्ट करण्याची होणार मागणी.
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या लिपिक व शिपाई ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थिना आंदोलनात सहभागी होण्याचे मनसेचे आव्हान!
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही चंद्रपूर जिल्ह्यापुरती *मर्यादित* आहे असे असतांना जिल्ह्यातील बेरोजगारांवर अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व ITI कंपनी चे बोगस अधिकारी मिळून फसवणूक करीत आहे. कारण अगोदरचं बैंकेचे अध्यक्ष, संचालक यांनी एजंट मार्फत 25 ते 35 लाख रुपये घेऊन नोकरी ज्यांना द्यायची आहे त्यांना ITI कंपनीच्या मार्फत परीक्षेत पास करण्यासाठी वेगळी खेळी केली आहे, तर मग जिल्ह्यातील बँकेनी जिल्ह्याबाहेरील परीक्षा केंद्र निवडण्याचे प्रयोजन काय? 31 हजार बेरोजगारांची ही फसवणूक नाही कां? कारण 560 रुपये परीक्षा फि घेऊन परीक्षेसाठी जिल्ह्याबाहेरील केंद्रावर जाण्यायेण्याचा राहण्याचा जवळपास 5 हजार रुपये पर्यंत खर्च झाला तो खर्च बैंक अध्यक्ष किंव्हा संचालक मंडळ परीक्षार्थीना देणारं कां ? हे मोठे प्रश्न उत्तराच्या शोधात असल्याने सिडीसीसी बैंक नोकर भरतीमध्ये हजारो परीक्षार्थी यांची फसवणूक होतं असल्याने बैंक अध्यक्ष संतोष रावत व संचालक यांनी 100 कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार केला to समोर आणायचा असेल तर या सर्वांची नार्को टेस्ट करणे महत्वाचे आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थिनी मनसेने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे.
खरं तर बैक प्रशासनाने त्यांचे जे उमेदवार आहे त्यांच्याकडून अगोदरचं पैसे घेऊन त्यांना परीक्षेत पास कारण्यासाठी ITI कंपनी सोबत करार केला आहे, 360 पदापैकी जवळपास पूर्णच पदे आधीच भरल्या गेली आहे, त्यामुळे परीक्षार्थिना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर केवळ औपचारिकता म्हणून बोलावले असल्याचे दिसत आहे, कारण पैसे देणाऱ्या परीक्षार्थिना अगोदरचं प्रश्न उत्तरे मिळाली असल्याने बैंक भरतीचे पेपरचं फुटले असल्याचे अनेक परीक्षा केंद्रात घडले आहे व हजारो बेरोजगार परीक्षार्थीनी सिडीसीसी बैंक व्यवस्थापन यांच्याविरोधात आंदोलन पण केले आहे, राज्यातील आणि विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक होतकरू व स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे तरुण बेरोजगार यांना मात्र विनाकारण आर्थिक नुकसान होऊन मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागला आहे, कारण जिल्हा बैंकेची परीक्षा ज्या वातावरणात घेण्यात आली तिथे परीक्षेचा गुणात्मक दर्जाच नव्हता, त्यामुळे ही नोकर भरती केवळ औपचारिकता म्हणून आणि दाखविण्यासाठी म्हणून घेतल्याने हजारो विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिली त्यांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांची फार मोठी फसवणूक करण्यात आली आहे, त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये संहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचे आहे.
एकीकडे जिल्हा बैंक भरतीत घोटाळा झाला असतांना व तो स्पष्ट दिसत असतांना बैंक अध्यक्ष संचालक व व्यवस्थापन म्हणतात की परीक्षा पारदर्शक झाली, केवळ तांत्रिक अडचण आल्याने पहिल्या दिवशीची परीक्षा रद्द करण्यात आली, परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे लिपिक पदाच्या परीक्षेत सुद्धा घोळ झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही परीक्षा मैनेज करून घेतल्याचे दिसत असल्याने बैंकेच्या अध्यक्ष संचालक व ITI कंपनीच्या व्यवस्थापन यांची नार्को टेस्ट केली तर खरे आरोपी समोर येऊ शकतात व कोट्यावधीचा बैंक भरती घोटाळा बाहेर येऊ शकतो असे सहकार क्षेत्रात काम करणारे तज्ञ् सांगत आहे.
आमदार भोंगळे व जोरगेवार यांच्या विधिमंडळातील प्रश्नाचे काय?
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान विधिमंडळात बँकेच्या परीक्षेत फार मोठा घोळ केल्याचे व 40 लाख रुपये घेऊन बैंकेत भरती करीत असल्याचा आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार या दोन भाजपाच्या आमदारांनी विधिमंडळात करून बैंकेची ही नोकर भरती रद्द करा व नव्याने भरती प्रक्रिया राबवा अशी मागणी केली होती त्या मागणीचे आता नेमके काय झाले हे कळाले जरी नसले तरी विधिमंडळातील सभापती हे याबाबत सरकारला या नोकर भरतीच्या झालेला घोळ व भ्रष्ट मार्गाने घेतली जाणाऱ्या परीक्षेची चौकशी होईल कां याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बैंक भरतीत आरक्षण कुणाचे संपवले?
25 फेब्रुवारी 2022 च्या कायाद्यात मागासवर्गीय घटक असलेल्या एससी एसटी व ओबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय तरुण बेरोजगार युवकांनाआरक्षणाचा वाटा सरळ सेवा भरतीच्या 360 पदांमध्ये मिळायला हवा होता, त्यात अनुसूचित जाती 13%, चंद्रपूर जिल्हा आदिवासी असल्याने 15%, विमुक्त भटक्या जमाती 5%,इतर मागासवर्गीय 19% इत्यादी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेले सर्वमान्य आरक्षण लागू असतांना ते संपवले व खुल्या वर्गात जागा भरण्याचं काम केलं त्यामुळे मागासवर्गीय गोरगरीब हुशार विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे.
जिल्हा स्तरीय आंदोलन उभारण्यासाठी आरक्षण बचाव कृती समिती.
मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण सिडीसीसी बैंक नोकर भरतीत सम्पविल्याने दोषी असलेल्या बँकेच्या अध्यक्ष संचालक यांच्यावर कार्यवाही करण गरजेचे आहे, त्यामुळे मनसेतर्फे या संदर्भात मोठे जनआंदोलन उभारण्यासाठी तयारी सुरु असून मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष यांना निवेदन देऊन सुद्धा त्याच्याकडून कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नसल्याने विविध मागासवर्गीय संघटनेचे नेते कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी आरक्षण बचाव कृती समिती तयार करून “चंद्रपूर जिल्हा बँकेच्या परीक्षा रद्द करा व मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करून पुन्हा परीक्षा घ्या” या मागणीसाठी बँकेच्या लिपिक व शिपाई पदाची परीक्षा देणारे परीक्षार्थी यांनी सहभागी व्हावे व परीक्षेत घोळ झाल्याचे अनेक पुरावे जमा करून महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून सोमवार दिनांक 30.12.202 ला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायचे आहे तरी वरोरा नाका चौक येथे मोठ्या संख्येनी सर्व बहुजन समाजातील तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.