A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड

धनंजय मुंडें यांना धक्का

अमोल तौर ठाकुर बीड महाराष्ट्र :

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची निवड झालेली असून पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली आहे . तर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पंकजा मुंडे यांची वर्णी लागली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे . गुलाबराव पाटील हे जळगाव चे पालकमंत्री असणार आहेत. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे असणार आहेत. उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे . संजय राठोड यांच्या कडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .

धनंजय मुंडे यांना धक्का ;

राज्यात सध्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच गाजलेले आहे . या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत असून या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. अश्या परिस्थितीत धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळेस त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी जोर धरत होती अखेर बीडचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी पक्षाकडेच राहीले असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे पद देण्यात आले आहे. व माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना या यादीतून वगळण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!