
अढळगाव ते जामखेड असा 62 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण हे निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नुकतेच हे काम पूर्ण करत आणले असून काही ठिकाणी पुलाचे काम चालू आहे व वन विभाग तसेच रोड लगत असलेल्या गावातील काही ठिकाणच्या भागामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे परवानगी न मिळाल्याने काही ठिकाणच्या रस्त्याचे काम स्थगित आहे.
शितपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये नागलवाडी फाटा ते निंबोडी या दरम्यान रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून नुकत्याच रुंदीकरण व काँक्रिटीकरण केलेल्या या रस्त्यांच्या मध्यभागी मोठमोठ्या भेगा व मध्यभागी रस्ता चिरल्याचे चित्र पाहायला मिळाले व या भेगा गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच असून या रस्त्याच्या मोठमोठ्या भेगाची दुरुस्ती दरम्यान वापरण्यात आलेले लोखंडी बार हे अगदी रस्त्याच्या वरती उघडे दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्याकडून व नॅशनल हायवे अथोरिटी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वापरण्यात आलेले हे लोखंडी बार दोन ते चार इंच काँक्रिटीकरण मध्ये खाली असायला हवे असे सांगण्यात आले. परंतु भेगा एवढ्या मोठ्या आहेत की एखादी दुचाकीचे चाक त्यामध्ये शिरल्यास मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटीने संबंधित काम करणाऱ्या कंपनीला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले पण यावर दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. असे निकृष्ट दर्जााचे काम होत असताना कार्यरत अधिकार्यानकडून याची ऑडिट किंवा पाहणी बरोबर कशी करण्यात आली? या भेगामुळे एखाद्या वाहनाचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? या कामाची दुरुस्ती कधी होणार? व अशा पद्धतीचे काम करणाऱ्या कर्मचारी ठेकेदाराला जाब विचारत कारवाई केली जाईल का? असा स्थानिकांकडून प्रश्न विचारण्यात येत आहे. त्याचबरोबर आढळगाव ते जामखेड या संपूर्ण रस्त्याचे तपासणी व ऑडिट योग्य पद्धतीने झाले आहे का असाही प्रश्न निर्माण होतो? अढळगाव ते जामखेड दरम्यान रस्त्याचे काम चालू किंवा अपुरे आहे त्या त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कुठलेही दिशादर्शक बोर्ड नसल्याचे आढळून आले यावर नॅशनल हायवे अथॉरिटी काय कार्यवाही करणार असा ही प्रश्न निर्माण होत आहे.