
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा
चंद्रपूर :- सिडीसीसी बैंकेच्या बैंक खात्यावर सायबर हल्ल्यास बैंक प्रशासन दोषी?
कोट्यावधीचा सॉफ्टवेअर अपडेटसाठी खर्च, मग त्या ट्रस्ट फिनटेक लिमिटेड च्या कराराचे काय?
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या सर्व शाखांचे संगणकीकरण केले आहे. त्यादृष्टीने कोट्यावधी रूपये खर्चुन सॉफ्टवेअर अपडेट केले. दोन वर्षापूर्वीच सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात आला असतांना यात तांत्रिक चुका कशा राहील्या हा अत्यंत गंभीर प्रश्न असून सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाची जी उधळपट्टी ज्या कंपनीवर झाली आहे त्या ट्रस्ट फिनटेक लिमिटेड या कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह तर उभे राहतातच शिवाय ज्यांनी या कंपनीला काम दिले आणि त्या कंपनीकडून कमिशन घेतल्या जातेय त्या बैंक संचालकांची पण चौकशी व्हायला हवी, महत्वाची बाब म्हणजे 420 सारखे गंभीर गुन्हे दाखल असणारे बैंकेचे सिईओ कल्याणकर हे सुद्धा यामध्ये दोषी असल्याची शंका असल्याने त्यांचा सहभाग आहे कां? हे पण तपासल्या गेले पाहिजे, कारण जवळपास तीन दिवसानंतर बैंकेच्या ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी व्यवहारादरम्यान सायबर हल्ला झाला होता आणि तो पर्यंत सिईओ कल्याणकर यांच्या हे लक्षात आले नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या ऑनलाईन प्रक्रीया हॅक करून सायबर हल्लेखोरांनी ‘आरटीजीएस’ व एनईएफटी’ प्रणालीद्वारे खातेदारांच्या खात्यात रक्कम वळती केली जात असताना संपूर्ण यंत्रणा हॅक करून ३३ ग्राहकाच्या खात्यांतील ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रूपये लुटल्याचे प्रकरण समोर आल्याने सहकार क्षेत्रासह बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती, बैंकेच्या नोकर भरती घोटाळ्यानंतर सायबर हल्ल्याचा हा पुन्हा एक घोटाळा समोर आला आहे, मात्र आता बँकेकडूनच याप्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्यासाठी थर्ड पार्टी तर्फे फॉरेन्सिक ऑडीट करण्याची घोषणा करण्यात आली खरी परंतु सर्वसामान्य जनतेचा व विशेष करून शेतकऱ्यांचा पैसा भ्रष्ट बैंक प्रशासनाच्या हाताखाली सुरक्षित नसल्याची बाब आता उघड होतं आहे.
सिडीसीसी बैंकेच्या या सायबर हल्ल्यास स्वतः बैंक प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. बँकेमार्फत ‘आरटीजीएस व एनईएफटी’ प्रणालीसाठी नागपुरातील ट्रस्ट फिनटेक लि. या कंपनीसोबत कोर बैंकिंग सिस्टिम ‘करिता करार केला आहे. यासाठी येस बैंकची यंत्रणा वापरण्याकरिता येस बैंकने ट्रस्ट फिनटेक यांच्यात करार केला आहे. याच माध्यमातून चंद्रपूर जिल्हा बँकेचे सर्व ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी व्यवहार होत असतात. मात्र बैंकेत एखादे ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी व्यवहार करतांना बैंकेच्या दोन ते तीन कर्मचारी अधिकारी यांच्या देखरेखित ही प्रक्रिया चालते व त्याचा संगणकीय पासवर्ड असतो आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर मग एस बैंकेच्या सिस्टमच्या माध्यमातून तो पैसा संबंधितांच्या बैंक खात्यावर वळता केला जातो, मग प्रश्न हा पडतो की तीन दिवस सतत सुरु असलेले ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी व्यवहार बैंकेच्या सिईओ कल्याणकार किंव्हा त्त्यांच्या अधीनस्त अधिकाऱ्याच्या कां लक्षात आले नाही? खरं तर बँकेतील तांत्रिक सुरक्षेसंदर्भात ट्रस्ट फिनटेक या कंपनी सोबत कुठल्या मापदंडावर हा करार करण्यात आला याची थर्ड पार्टी चौकशी व्हायला हवी, कारण ज्या कंपनीला दरवर्षी दोन ते तीन कोटी बँकेतील तांत्रिक सुरक्षेसाठी खर्च होतं असेल तर मग ती कंपनी पण दोषी आहे आणि त्या कंपनीला कंत्राट देणारे संचालक सुद्धा.
सिडीसीसी बैंक म्हणजे भ्रष्टाचार आणि चोऱ्या करणाऱ्याचं राजश्रय?
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या भ्रष्ट कारभाराची चर्चा नोकर भरतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहचली खरी पण त्याहीपलीकडे बैंकेतील अंतर्गत व्यवहार सुद्धा तितकेच भ्रष्ट असल्याच्या घटना इथे घडल्या आहेत, जणू भ्रष्टाचारी आणि चोरांची टोळी येथे कार्यरत आहे असेच चित्र दिसत आहे, चंद्रपूर शहर जिल्हा परिषदेसमोरील बैंक शाखेत घाटे नामक कर्मचाऱ्याने आर्थिक घोळ केला होता. मेंडकी येथील शाखेत आर्थिक अपहार उजेडात आला होता. चंद्रपर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेतील संचालकांनी कर्जफेड न केल्याने रिझर्व बैंकेने दोन लाख पन्नास हजाराचा बैंकेवर दंड थोपटला तर संचालक मंडळाचा अंतर्गत कलह, प्रशासनातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा व भ्रष्टाचार फोफावल्याने वित्तीय संस्था असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता आर्थिक गुन्हे राजरोसपणे सुरु आहेत, नव्हे भ्रष्टाचार आणि चोऱ्या करणाऱ्यांचं हे राजश्रय बनलं की काय अशी स्थिती दिसतं.