A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

डॉ. राणू सुरेश देवरे मानद विद्यावाचस्पती अवॉर्ड ने सम्मानि

  • वर्धा: पुलगाव येथील महिला स्वरोजगार प्रशिक्षण, न्यू इंडियन एडुकेशन च्या केंद्र संचालिका डॉ. राणू देवरे यांना काशी हिंदी विद्यापीठ वाराणसी उत्तरप्रदेशमार्फत ‘डॉन वास्को युथ सेंटर’ कोरेगाव पुणे येथे झालेल्या भव्य मानद व उपाधी वितरण सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ”विद्यावाचस्पती” या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलाधिपती वाराणसीचे
    कवी सुखमंगल सिंह, डॉ. संभाजी बाविस्कर, कवी इंद्रजीत तिवारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राज अल्विन देवदास, मुख्य अतिथी डॉ. चंद्रपाल सुकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. राणू देवरे यांच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. डॉ. राणू देवरे यांना मिळालेल्या मानद उपाधीकरिता केंद्राचे अध्यक्ष गजेंद्र बनगर यांनी विशेष अभिनंदन केले तसेच प्रीतम जामदार, नितीन देशमुख, संजय सोनटक्के, स्वप्नील देवरे , सुरेश देवरे ,प्रमिला धलवार, गोपाल शेंदुरसे, गिरीश मोहरे,अरविंद भिसे,अमोल मिर,सुजित सुरसे यांनी डॉ. राणू देवरे यांचे अभिनंदन केले.
Back to top button
error: Content is protected !!