
संजय पारधी बल्लारपूर, महाराष्ट्र
बल्लारपूर :- दि. 19.03.2025 बुधवार महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनीनी अंगणवाडी केंद्र क. 19 शिवाजीवार्ड बल्लारपूर येथे भेट दिली अंगणवाडी हे ग्रामीण व शहरी भागात ‘चालवले जाणारे माहिती केंद्र आहे ज्यामध्ये महिला आणि मुलाच्चा सर्वांगिण विकासावर अधिक भर दिला जातो अंगणवाडी मध्ये 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलीचे पूर्व प्राथमिक शिक्षण समाविष्ट आहे. आणि माता व बालकांचे आरोग्य, ‘आहार, कुपोषण व इतर समस्याकडे लक्ष दिले जाते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या मार्गदर्शनखाली ग्रहअर्थशास्त्र विभागाने 19.03.25 रोजी भेट दिली. सर्वप्रथम ग्रहअर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. विभावरी नखाते यांनी प्रास्ताविक करून दिली व तिथे उपस्थित अंगणवाडीच सेविका वंदना मुळे व योगिता देवाळकर मॅडम व यांनी विद्यार्थिनिशी संवाद साधून अंगणवाडीचे कार्य, मुलाचे पोषण व विकास गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच करियर च्या संदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा कवाडे मॅडम ने माणले. Ya भेटीसाठी महात्मा ज्योतिबा फूले महाविद्यालयातील बी.ए. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच अंजणवाडी मदतनिस वंदना चेर्लावार यांनी सहकार्य केले