
:- दिनांक 27 ते 29 एप्रिल 2025 या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलारीपयट्टु अजिंक्य स्पर्धा चे आयोजन केलेले आहे सदर या स्पर्धेला महाराष्ट्रातून सर्व जिल्हे आपले जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे त्याकरिता दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी स्थानिक पँथर्स स्पोर्ट अकॅडमी, बागला नगर, बाबूपेठ रोड चंद्रपूर येथे सकाळी 11.00 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी ठेवलेली आहे तरी निवड चाचणी सब ज्युनिअर, जुनियर व सीनियर या वयोगटात मुलं व मुली त्यांच्या साठी घेण्यात येणार आहे सदर निवडलेले खेळाडू नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलारीपयट्टू अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व करणार. त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत जे खेळाडू प्राविण्य प्राप्त करेल त्यांना खेलो इंडिया युथ गेम तसेच नॅशनल गेम मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. कलारीपयट्टू हा खेळ उत्तराखंड येथे झालेले नॅशनल गेम मध्ये समाविष्ट होता. याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त खेळाडू या निवड चाचणीत यावे अशी विनंती चंद्रपूर जिल्हा कलारीपयट्टू असोसिएशनचे सचिव श्री मुकेश पांडे सर यांनी केले तसेच अधिक माहिती करिता 7020836566 वर संपर्क करावे.