A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

पुणे: कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संतोषनगर भागात घाणीचे साम्राज्य महानगरपालिकेचे दुर्लक्ष

कात्रज संतोष नगर अय्यप्पा मंदिर महावितरण डीपी शेजारील परिसरात हा मोठ्याप्रमाणात पडणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधीचा याठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याने ये जा करत असताना या ठिकाणी अशा पद्धतीचा कचरा टाकण्यात येत होता. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु चित्र काही बदलत नव्हते. आतापर्यंत न हटलेला कचरा हा अगदी एका रात्रीमध्ये गायब झाला यासाठी घनकचरा विभागाच्या महिला सॅनिटरी इन्स्पेक्टर  प्रियांजली पवार व विभाग सुपरवायझर प्रवीण पाटोळे यांच्याकडे वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूजचे व AIMA सदस्य विशाल अडागळे यांच्या वतीने तक्रार केली असता तात्काळ दखल घेऊन एका रात्रीमध्ये अशा पद्धतीचे चित्र बदललेले दिसले. या भागामध्ये पालिकेचे घनकचरा विभाग कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून विभाग मोठा आहे अपुऱ्या सुख सुविधांमुळे अशा पद्धतीचे चित्र निर्माण होत असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यापुढेही असा कचरा टाकल्यास योग्य ती खडक कारवाई पालिकेच्या वतीने करण्यात येईल व वेळोवेळी या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात येईल असेही यावेळी नमूद करण्यात आले. हे खालील चित्र पाहून स्थानिक नागरिकांनी एक आनंदाचा श्वास घेत दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळाल्याने नागरिक आनंदी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अशा पद्धतीची झटपट बदललेल्या चित्रामुळे स्थानिक नागरिकांकडून वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज, AIMA सदस्य विशाल अडागळे तसेच घनकचरा विभाग सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रियांजली पवार व त्यांच्या टीमचे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!