
प्रेस विज्ञप्ति
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
अहिल्यानगर(अहमदनगर)
अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. याप्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि मोठ्या संख्येनं उपस्थित अनुयायांशी मनमोकळा संवाद साधला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक द्रष्टे, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी कायदा, पाटबंधारे, मजूर आणि ऊर्जामंत्री म्हणून केलेलं काम पिढ्यांपिढ्या कायम स्मरणात राहील. देशातील गरीब, वंचित, उपेक्षित घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार दिला. त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं बळ दिलं. त्यांच्या या कार्याचा आदर ठेवून आपल्या महायुती सरकारनं उपेक्षित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्यायासाठी साडे २५ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी कुठंही निधीची कमतरता भासू देणार नाही, याची ग्वाही दिली.
अनेक विविधतेनं नटलेला आपला भारत देश जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ७५ वर्ष अखंड एकजूट ठेवण्याचं काम केलं त्याचं सर्व श्रेय हे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्या भारतीय संविधानाला जातं. आजकाल फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो पण जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का देखील लावू शकणार नाही.
मुंबईत चैत्यभूमीजवळ हिंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक देखील अधिक उंच व भव्य करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे. हे स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वासही व्यक्त केला.
अहिल्यानगरात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा हा पुढील पिढ्यांना बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देणारा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच आ. संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार अहिल्यानगरमध्ये ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा केली असून, यासाठी आवश्यक असलेला १५ कोटींचा निधी पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समन्वयाने डीपीसीतून ५ कोटी आणि राज्याकडून १० कोटी अशा पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेसं असं संविधान भवन या अहिल्यानगर मध्ये लवकरच पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास दिला.
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015