A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य

अहिल्यानगर, दि. १४ : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगरसह पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दिनांक १६ सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
🌊 नद्यांमध्ये विसर्ग वाढला; पूरस्थितीचा धोका

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.

भिमा नदी (दौंड पूल) – ४,३७६ क्युसेक
गोदावरी नदी (नांदूर मध्यमेश्वर) – १,६१४ क्युसेक
जायकवाडी धरण – ५६,५९२ क्युसेक
प्रवरा नदी (भंडारदरा) – ८२० क्युसेक
निळवंडे धरण – ७०० क्युसेक
मुळा धरण – ५०० क्युसेक
कुकडी नदी (येडगाव धरण) – ७५० क्युसेक

या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
⚠️ प्रशासनाकडून सूचना

मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब व उघड्या जागी उभे राहू नये.
विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा.
नदी, ओढे, नाले व पूल पाण्याने भरले असतील तर त्यावरून प्रवास करू नये.
पाणीपातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे.
शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.
पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे.
आपत्कालीन परिस्थितीत पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

📞 जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक – १०७७
☎️ दूरध्वनी – ०२४१-२३२३८४४, २३५६९४०

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!