A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*गडचिरोली नगरपरिषद निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन; महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न*

*गडचिरोली नगरपरिषद निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन; महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न*

प्रेस नोट
गडचिरोली

*गडचिरोली नगरपरिषद निवडणूक प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन; महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न*
——————————————
*“गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील” — मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन..*
————————————–
*आमदार बंटी भाऊ भांगडिया यांचे विजयासाठी प्रभावी मार्गदर्शन – भाजपा नेत्यांचा विकासाभिमुख संकल्प*

दि. २२ नोव्हेंबर २०२५ | गडचिरोली

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी रोड, बसस्टॉपसमोरील पटांगणावर भाजपा प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बावनकुळे साहेब म्हणाले,“ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. जाहीरनामा करण्याची क्षमता फक्त भाजपाकडे आहे, कारण भाजपा जे बोलतो तेच प्रत्यक्षात साकारतो. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्यामुळे अनेक नेते कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजपात प्रवेश करत आहेत, हे आनंददायी आहे.”
असे ते म्हणाले आणि आगामी निवडणुकीत विजयसंकल्प दृढ करण्याचे आवाहन केले.
*“गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने अग्रेसर राहील” — मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन..*
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी या प्रसंगी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत म्हणाले—
“मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. गडचिरोली हा शेवटचा जिल्हा नसून विकासाच्या शर्यतीत अग्रेसर जिल्हा राहणार आहे. केंद्र व राज्यात भाजपा सरकार असल्याने नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात आल्यास अनेक मोठी विकासकामे वेगाने पूर्ण होतील.”
यानंतर पुढे आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामांचा उल्लेख करत म्हणाले रेल्वे प्रकल्प,मेडिकल कॉलेज, हवाई पट्टा,कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ,सुरजागड लोह प्रकल्प,१५,००० कोटींच्या रस्त्यांची विकासकामे,वैनगंगा नदीवरील बॅरेजेस,एकलव्य विद्यालय, असे अनेक विकास कामे केली “जर गडचिरोलीचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर नगराध्यक्ष पदावर प्रणोती सागर निंबोरकर आणि सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी करणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
*विजयाचा संकल्प — बंटी भाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडिया*
चिमूरचे लोकप्रिय आमदार व गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी भाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडिया यांनी सविस्तर मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीत भाजपा प्रचंड मताधिक्याने विजय मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
*प्रणोती सागर निंबोरकर यांचा विजयसंकल्प*
भाजपाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आणि या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्याचा संकल्प मांडला.
*भाजपात काँग्रेसच्या नेत्यांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश*
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,यांच्या कार्यकर्तृत्वावर व विकासाभिमुख कार्यावर विश्वास ठेऊन तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व माजी खासदार डॉ. अशोकजी नेते आणि आमदार बंटी भाऊ भांगडिया,आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपात दाखल झाले.
पक्ष प्रवेश घेणाऱ्यांमध्ये—
अतुल मल्लेलवार – काँग्रेस प्रदेश युवक सचिव,आकाश बघेल – काँग्रेस जिल्हा महासचिव,विनोद भोयर,भगवान चिडंगे तसेच अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.या सर्वांनी भाजपा दुपट्टा स्वीकारत पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमास प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. देवराव होळी,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,
माजी आमदार कृष्णा गजबे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे,कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे ,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितिन कोडवते,भाजपा नेत्या डॉ. चंदाताई कोडवते,आरपीआय जिल्हाध्यक्ष मेघराज घुटके,तसेच भाजपा नगरसेवक उमेदवार यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!