A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र
Trending

जामखेड तालुका मध्ये बिबट्याचा वावर – ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा..

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव अहिल्यानगर 

जामखेड .

 बावी, खांडवी, डिसलेवाडी, कुसडगाव, सरदवाडी आणि भोगलवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की सदर भागात बिबट्याचा सक्रिय वावर आढळून आला आहे. मौजे खांडवी येथे एका महिलेवर तसेच काही जनावरांवर बिबट्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

 

या परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे:

 

1. संध्याकाळनंतर व लवकर पहाटे एकटे बाहेर जाणे टाळावे.

 

 

2. लहान मुले, वृद्ध आणि जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

 

 

3. शेतात, ओसाड जागी किंवा झाडीझुडपात जाताना सावधगिरी बाळगावी व परिसराची पाहणी करावी.

 

 

4. बिबट्या दिसल्यास किंवा त्याच्या हालचालींचा संशय आल्यास तात्काळ वनविभाग, पोलीस पाटील किंवा ग्रामपंचायतीस कळवावे.

 

 

 

सर्व ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन सतर्क रा

हावे, ही विनंती.

Show More
Back to top button
error: Content is protected !!