A2Z सभी खबर सभी जिले कीउल्हासनगरकोल्हापुरथाणेदेशधाराशिवनई दिल्लीनासिकपुणेमहाराष्ट्रमुंबईलातूरवर्ल्डकप 2023संगमनेर

श्री ढोकेश्वर कॉलेजच्या संघाने पटकावला सेनापती बापट नाट्य करंडक

वंदे भारत टीव्ही न्युज करीता शहाजी दिघे

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू आर्टस्, कॉमर्स &  सायन्स कॉलेज, पारनेर आणि टीम आडवाटेचं पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर महाविद्यालयात तिसऱ्या सेनापती बापट नाट्य करंडकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयीन गटातून श्री ढोकेश्वर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना अशा दोन संघानी सहभाग घेतला.राष्ट्रीय छात्र सेनेच्या संघाने सोशल मीडियाचा अतिवापर या विषयावर नाट्य सादर करून तृतीय क्रमांक पटकावला, तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संघाने लोकशाहीतील कढीपत्ता – कार्यकर्ता या विषयावरील नाट्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावत मानाचा सेनापती बापट नाट्य करंडक पटकावला. सेनापती बापट नाट्य करंडक स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.

या स्पर्धेत माध्यमिक विद्यालये व महाविद्यालये मिळून जवळपास 20 पेक्षा अधिक संघानी सहभाग घेतला. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना संघासाठी प्रा. संकेत ठाणगे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रा. नामदेव वाल्हेकर, प्रा. शांता गडगे, प्रा. संकेत ठाणगे यांनी मार्गदर्शन केले तर प्राचार्य आर.के. आहेर यांनी स्वतः दोन्ही संघांच्या तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले

Back to top button
error: Content is protected !!