राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा..
देवळाली प्रवरा शहरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी 10/2/2024 रोजी अनिल दादा संसारे व अविनाश साहेबराव संसारे यांच्या विहिरी मधून दोन मोटरी चोरी गेल्या तर एक मोटर आहे तशीच विहिरीमध्ये पाहावयास मिळाली.
सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी सुनील साहेबराव संसारे हे गेले असता मोटार चालू झाली नाही हे बघताच त्यांनी त्यांच्या मनात शंका आली की मोटरला काही प्रॉब्लेम झाले असेल नंतर त्यांनी आपल्या हातातील बॅटरी विहिरीकडे लावली असता त्यांना मोटरीचा मोकळा पाईप वर दिसला त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोक्यात मोटार चालू करण्यासाठी गेले तर तीही मोटर चालू झाली नाही तर त्यांनी पुन्हा आपली टॉर्च विहिरीमध्ये दुसऱ्या बाजूने लावली तर तोही पाईप मोकळा दिसून आला.
त्यानंतर सुनील संसारे व अविनाश संसारे यांनी पुन्हा एकदा चहुबाजूने विहिरीच्या कडेने बॅटरी लावून बघितले तर विहिरीमधील तीन मोटरी पैकी दोन मोटरी चोरीला गेलेल्या दिसून आल्या त्यानंतर त्यांनी सदर घडलेली गोष्ट त्यांचे मोठे बंधू अनिल दादा संसारे ते देवळाली प्रवरा मध्ये राहतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना झालेल्या चोरी बद्दल कळवले व त्यानंतर अनिल दादा संसारे यांनी शेतामध्ये येऊन विहिरीवर पाहिले असता त्यांची व त्यांच्या लहान्या बंधु ची मोटर चोरीला गेलेली दिसून आली
त्यानंतर अनिल दादा संसारे यांनी झालेल्या चोरी बद्दल सांगितले नंतर त्यांनी पाहिले असता दोन मोटरी चोरीला दिलेल्या दिसून आल्या व एक मोटर विहिरीमध्ये जशीची तशी पाहायला मिळाली.
आत्तापर्यंत देवळाली प्रवरा शहरामधून अनेक शेतकऱ्याच्या येथे चोऱ्या झाल्या आहेत काही शेतकऱ्यांची स्प्रिंकलर सेट गेलेत तर काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरच्या बॅटरी गेल्यात एक तर शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच हतबल आहे त्याच्यात असे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने यामध्ये जातीने लक्ष घालून या चोरांच्या मुस्क्या आवळाव्यात अशी देवळाली प्रवरा शहरामधून चर्चा होत आहे..
तसेच
विहिरीवर उपस्थित त्यांचे भाऊबंद व शेजारी अनिल दादा संसारे. सुरेखा विश्वास शिंदे. ताई बाई संसारे. ज्योती संसारे. सुनिता संसारे . अविनाश संसारे. सुनील संसारे. जगदीश संसारे. रावसाहेब वाघ आदी सह उपस्थित होते…