A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

९ ला. भंडारा युवक बिरादरी द्वारा क्रांतीस्वर. देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

९ ला. भंडारा युवक बिरादरी द्वारा क्रांतीस्वर. देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

प्रेस विज्ञप्ति
भंडारा

९ ला. भंडारा युवक बिरादरी द्वारा क्रांतीस्वर. देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

भंडारा:- प्रथम युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या भंडारा युवक बिरादरी शाखेचे संस्थापक स्व. श्री. मनोज दाढी यांनी सुरु केलेल्या या शाखेला दि ९ ऑगस्ट २०२५ रोजी ३१ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, क्रांती दिनाचे ८३ वे वर्ष, भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत.
आपल्या सर्वांच्या बहुमोल सहकार्याने युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या भंडारा युवक बिरादरी शाखेद्वारे दरवर्षी क्रांतीस्वर भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा घेतली जाते. या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत, देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा तसेच दिनाक ९ ऑगस्ट२०२५ ला दरवर्षीप्रमाणे हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक भंडारा येथे सकाळी ८.३० वा. मशाल प्रज्वलित करून शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि हुतात्मा स्मारक ते गांधी चौक या मार्गे मशाल रॅली चे आयोजन आहे.
शनिवार दिनांक ९ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ९.३० वां. सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे क्रांतीस्वर भव्य देशभक्ती पर समूहगीत स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. शालेय विद्यार्थी यांनी समूह गीत स्पर्धेत वर्ग ७ ते १० वी या वर्गातील विद्यार्थ्यां यांनी सहभाग घ्यावा. राष्ट्रीय नेतृत्व, देशाभिमान जागृत करणारी सामाजिक व राष्ट्रीय मूल्य जोपासणारी, कलाकारांना वाव देणारी ही स्पर्धा आहे.

*क्रांतीस्वर समूहगीत स्पर्धेच्या अटी*

स्पर्धेत सादर होणारे समूहगीत राष्ट्रीय विचारवंतांना, देशभक्तांना, क्रांतिवीरांना, शहीदांना समर्पित असणारे क्रांती गीत, शोर्या गीत, समरगीत, देशभक्ती गीत मराठी किंवा हिंदी भाषेतील असावे. वरील स्पर्धा वर्ग ७ ते १० वी च्या विद्यार्थी यांच्या साठी असेल, समुहात ८ ते १० विद्यार्थी असावे. गायन सादरीकरण ७ मिनिट वाद्य नियोजन २ मिनिटं एकूण ९ मिनिट आतील असावा, सादरीकरण करताना चमुचे नाव पत्ता, वर्ग, व विषय सांगावे. गायक गायिका स्पर्धक सोडून जास्तीत -जास्त ४ वादक कलावंत स्पर्धेत राहू शकतील. वाद्याचे बंधन नाही. वयाचे व व्यवसायाचे बंधन नाही. विद्यार्थी वादक असल्यास अधिकचे गुण दिल्या जाणार नाही. सर्व सहभागी संघांचे निकाल दि. ९ ऑगस्ट २०२५ ला दुपारी २ वा. जाहीर करून सार्वजनिक वाचनालय गांधी चौक भंडारा येथे. पुरस्कार वितरण फिरते चषक देऊन करण्यात येईल. व सहभागी चमुंना प्रमाणपत्र किंवा स्मृती चिन्ह देण्यात येईल. परिक्षक मंडळाचा निर्णय सर्वाना बंधनकारक राहील. सर्व अंतिम अधिकार आयोजकांच्या स्वाधीन आहेत. मागच्या वर्षी विजेत्या चमुनी सादर केलेले तेच गीत या वर्षी चालणार नाही त्यांनी नवीन गीत सादर करावे.

*पुरस्काराचे स्वरूप समूहगीत*

प्रथम पुरस्कार फिरता चषक, स्मृतिचिन्ह आणि ३००० रु. द्वितीय पुरस्कार फिरता चषक, स्मृतिचिन्ह आणि २००० रू तृतीय पुरस्कार फिरता चषक, स्मृतिचिन्ह आणि १००० रु. देण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता सुरेंद कुलरकर- 8888652443 वर्षा मनोज दाढी 8805543438 विक्रम फडके 9421896363. वैभव कोलते. 9730747612 यशपाल कऱ्हाडे, 7588789572 प्रशांत वाघाये 827539738 सागर ठाकरे 77099 52272 मोरेश्वर समरित 99215 46191 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन भंडारा युवक बिरादरीच्या अध्यक्षा सौ. सरिता फुंडे, संचालिका वर्षा दाढी यांनी केले आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!