A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर
Trending

दुर्गम क्षेत्रातील आदिवासी मुलांना स्कुल बॅग वाटप आसमान फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

दुर्गम क्षेत्रातील आदिवासी मुलांना स्कुल बॅग वाटप आसमान फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

नागपूर प्रतिनिधि

दुर्गम क्षेत्रातील आदिवासी मुलांना स्कुल बॅग वाटप
आसमान फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
=============================
आसमान फाऊंडेशनतर्फे आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्र भोरगड, काटोल येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील मुलांना स्कुल बॅगचे वितरण केले गेले. या निवासी शाळेत गरीब आदिवासी मुलांना नि:शुल्क शिक्षण दिले जाते. याप्रसंगी शालेय परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. आदिवासी शाळेच्या मुलांनी फाऊंडेशनच्या पदाधिका-यांचे पुष्प देवून स्वागत केले. डॉ. रवि गि-हे यांनी या दुर्गम क्षेत्रातही एकात्मिका आदिवासी विकास प्रकल्प, नागपूरच्या अंतर्गत आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्याबद्द्ल संतोष व्यक्त केला तसेच शासनाच्या सहयोगाने या भागात महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, युवा रोजगार केद्र व अन्य सामाजिक कार्याचे केंद्र बनविले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आसमान फाऊंडेशन अशा विभिन्न सामाजिक कार्यात पूर्ण सहयोग करीत असते. शाळेचे अधिक्षक एस.बी. पोटोडे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमाने केल्या जात असलेल्या विभिन्न कार्यक्रमाची प्रशंसा केली व आदिवासी मुलांना अधिकाधिक प्रोत्साहित करावे अशी अपेक्षा केली.
याप्रसंगी श्रीमती सोनू बागडे, ब्लॉक ऑफिसर काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर विशेष आमंत्रित होत्या. फाऊंडेशनच्या वतीने सचिव नरेश शेंडे, भास्कर मुलताईकर, नरेंद्र विंचुरकर, दिनेश टेकाडे, आसमान महिला सोसायटीच्या अध्यक्ष सौ. मेघा गि-हे, उपाध्यक्ष सौ. विभा विंचुरकर, सौ. छाया मुलताईकर, कुंदा धकाते, अभिषेक पिंजरकर, रिमांश मुलताईकर उपस्थित होते. आदिवासी शाळेतर्फे शिक्षिका स्मिता मनोहर, पूजा मॅडम व स्टाफ सदस्यांनी परिश्रम घेतले.

डॉ. रवि गि-हे
अध्यक्ष
आसमान फाऊंडेशन
=============

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर Devashish tokekar

Back to top button
error: Content is protected !!