
संजय पारधी बल्लारपूर
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर मध्ये आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 ला हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला .
या निमित्ताने महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील खेळांचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये लिंबू चमचा , लगोरी , पोत्यांची रेस , कंचे, विटी दांडू , हळूवार सायकल चालवणे , गुलेल ची शूटिंग अशा प्रकारचे अनेक खेळांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. ग्रामीण भागातील खेळ आता दिसेनासे झालेले आहे त्यामुळे खेळाडूंमध्ये एकत्वाची भावना निर्माण होते. या खेळाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागचे प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळांमध्ये सहभाग घेतला. अशाच प्रकारच्या खेळाचे आयोजन नेहमी होत राहावे असे विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले.





