A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

अशोक पडगेलवार यांना महर्षी वाल्मिकी पुरस्कार।

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : जन आक्रोश समाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने स्नेह संमेलन व सत्कार समारंभाचे आयोजन आराध्य लान वरोरा येथे करण्यात आले समाजिक क्षेत्रातील अनमोल कार्याबद्धल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार तथा समाजिक कार्यकर्ते श्री अशोक पडगेलवार यांना महर्षी वाल्मिकी ऋषी पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे उदघाटक विकास पुरुष मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वणे संस्कृतिक मत्स्य व पालकमंत्री चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाशजी काकडे मुख्य संघटक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऍड अमोल बावणे नंदूभाऊ पढाल राहुल दडमल योगिताताई लांडगे कल्पनाताई क्षीरसागर मायाताई पेंदोर इत्यादीची प्रमुख उपस्तिती होती या सर्वांच्या उपस्तितीत समाजिक कार्याच्या अनमोल सहकार्या बद्धल मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते श्री अशोक पडगेलवार यांना शाल श्रीफळ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला समाज परिवर्तनासाठी नेहमी झटणारे जादूंच्या मनोरंजनातून समाज प्रबोधन करणे समाजातील अंधश्रद्धा नस्ट करणे व्यसनापासून परावृत्त करणे व शिक्षणासाठी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या साठी प्रयत्न करणे इत्यादी समाजसेवेसाठी त्यांच्या कार्याची पावती व बहुमान म्हणून गौरविण्यात आले या अगोदरही समाजिक क्षेत्रातील समाज भूषण पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार तर जादू क्षेत्रातील जादू शिरोमणी पुरस्कार जादुकला रत्न 20 च्या आसपास पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहेत या पुरस्कारा बद्धल भाग्यश्री बावणे वसंता बावणे रवी धारणे संतोष पिंपळकर अनिल गर्गेलवार राहुल देवतळे विठ्ठल देशमुख निशा राजपूत हेमलता धारणे निता देवगिरकर संगीता जुनघरे निता नागतुरे मनीषा रामपूरकर इत्यादिनी अभिनंदन केले आहे

Back to top button
error: Content is protected !!