
संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्र
चंद्रपूर : सामान्य रुग्णालय येथील सहाय्यक अधिसेविका सौ आशा वामनरावं बावणे हिला भारताच्या प्रथम नागरिक तथा महामाहीम राष्ट्रपती द्रोपदि मुर्म यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या चंद्रपूरातील रहिवासी असून चंद्रपूरचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा सन्मान मिळाला सदर कार्यक्रमाच आयोजन परिवारिक व मित्रमंडळींनी श्री गुंडावार यांच्या प्रांगणात मनोज बोरिवार अशोक पडगेलवार राजू पोटदुखे निता राजेंद्र रामेडवार वैशाली बोरिवार प्रभाकर बोरिवार प्रदीप सोनुने इत्यादिनी केले आशाताईंनी स्वास्थ विभागात 28 वर्ष सेवा केली असून आदिवासी नक्षलवादी दुर्गम भागात 20 वर्षांपासून सेवा देत आहे आलापल्ली येथे डायरीयाची लागवण झाली असताना मृत्युचे प्रमाण वाढत होते तेव्हा त्यांना चमूसाहित पाचारन् करण्यात आले खूप मेहनत घेऊन लसीकरण करून मृत्युचे प्रमाण आटोक्यात आणले कोविड च्या काळातहि 2 वर्ष सतत जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून कोविड लागण असलेल्या रोग्यांची सेवा केली त्यात स्वतःला सुद्धा कोविड ची बाधा झाली होती हज यात्रेकरूचे टिकाकरण असो की राष्ट्रीय स्तरावरील स्वास्थ विभागाचे कार्यक्रम गावागावात व घरोघरी जाऊन लसीकरण व टिकाकरण करणे इत्यादी महान कार्याचा गौरव म्हणून महामाहीम राष्ट्रपती द्रुपदी मुर्म यांच्या हस्ते राष्ट्रपती भवण दिल्ली येथे आशा वामनरावं बावणे सोनुने हिला न्याशनल फ्लोरेन्स नाईटिंगल 2024 चा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले त्या महाराष्ट्रातील एकमेव सत्कार मूर्ती होत्या सतीश पाटील अभय शिंगाभट्टी संजय चापले संजय शिवरकर यानी अनमोल सहकार्य करीत कार्यक्रम यशस्वी केला त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्धल साहिल बोरिवार दीपांशु सोनुने आरुष सोनुने संजय सोनुने शुभम रामेडवार् इत्यादिनी अभिनंदन केले आहे कार्यक्रमाच सूत्र संचालन अशोक पडगेलवार तर आभार संजय शिवरकर यानी मानले