चोपडा, (प्रतिनिधी- राहुल खेवलकर): तालुक्यातील सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोंबर ला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोंबर ला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते.लांब मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.)
2,516 Less than a minute